Accident News esakal
नाशिक

Nashik Accident News : दुचाकीच्‍या धडकेत पादचारी विद्यार्थ्याचा मृत्‍यू

Nashik Accident : त्र्यंबकरोडवरून भरधाव जाणाऱ्‍या दुचाकीने रस्‍ता ओलांडणाऱ्‍या युवकाला जोरदार धडक दिल्‍याची घटना शुक्रवारी (ता.१५) रात्री उशिरा घडली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : त्र्यंबकरोडवरून भरधाव जाणाऱ्‍या दुचाकीने रस्‍ता ओलांडणाऱ्‍या युवकाला जोरदार धडक दिल्‍याची घटना शुक्रवारी (ता.१५) रात्री उशिरा घडली. या धडकेत गंभीर जखमी युवकाचा मृत्‍यू झाला आहे. वेपुलो पुरणा वामसी (वय २३) असे मृत युवकाचे नाव असून तो तेलंगणाचा असून नाशिकच्‍या संदीप विद्यापीठात शिक्षण घेत होता. (Nashik Accident student dies in collision with bike marathi news)

शुक्रवारी (ता.१५) सायंकाळी शैक्षणिक संकुलाबाहेर आल्‍यावर रस्‍ता ओलांडताना नाशिककडून त्र्यंबकेश्‍वरच्‍या दिशेने भरधाव चाललेल्‍या दुचाकीने त्‍याला धडक दिली. या अपघातात वेपुलो याला गंभीर दुखापत झाली. दुचाकीवरील दोघे घसरत गेले. अपघातग्रस्‍तांना मदतीसाठी येथे स्‍थानिकांची मोठी गर्दी झाली होती.

दरम्‍यान शैक्षणिक संकुलात रुग्‍णवाहिका उपलब्‍ध असूनही तब्‍बल ४५ मिनिटांनी रुग्‍णवाहिका उपलब्‍ध झाल्‍याचा आरोप जमावाने केला. तसेच संबंधित मुलाला वेळीच उपचार मिळू न शकल्‍याने त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याचा दावा केला. दरम्‍यान शनिवारी (ता.१६) शवविच्‍छेदन करून मृतदेह कुटुंबियांना सोपविला. (latest marathi news)

संस्‍थेने फेटाळले आरोप

यासंदर्भातील आरोप संदीप विद्यापीठातर्फे फेटाळले आहेत. अपघात झाल्‍यावर काही मिनिटांतच रुग्‍णवाहिका उपलब्‍ध करून दिली गेली. तसेच जखमी युवकाला उपचारार्थ महात्‍मानगर येथील मोठ्या खासगी रुग्‍णालयात नेण्यात आले.

तेथील डॉक्टरांच्या सल्ल्‍याने जिल्‍हा रुग्‍णालयात नेल्‍याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघाताची घटना दुर्दैवी असून, यासंदर्भात मृत युवकाच्‍या कुटुंबीयांचे सांत्‍वन केले आहे. त्‍यांची कुठलीही तक्रार नसल्‍याचेही संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20I Live: अभिषेक शर्माचा विश्वविक्रम! अनोखे 'शतक' अन् मोडला रोहित शर्माच्या नावावर असलेला विक्रम

Digital Arrest Scam:‘दोन तासांत दिल्लीला या’; पोलिसांच्या नावाने धमकावून ४३ लाख उकळले

Latest Marathi News Live Update : ‘मुलांकडे माहिती आहे, पण ज्ञान नाही; शिक्षकांची जबाबदारी मोठी’ – देवेंद्र फडणवीस

Alephata Garbage: आळेफाटा बायपासवर कचऱ्याचे ढीग; दुर्गंधीने नागरिक आणि वाहनचालक त्रस्त

IND vs NZ 2nd T20: भारतीय गोलंदाजांचा सुरुवातीला कहर, मग फिलिप्स-जॅकोब्सचा पलटवार! न्यूझीलंडने डाव सावरला, अखेर काय घडलं?

SCROLL FOR NEXT