Sundarnarayan Mandir  esakal
नाशिक

Sundarnarayan Mandir : सुंदरनारायण मंदिर जीर्णोद्धारासाठी आणखी 2 वर्षे; प्रशासनाकडून हिरवा कंदील

Sundarnarayan Mandir : अहिल्यादेवी होळकर पुलाला लागून असलेल्या श्री सुंदरनारायण मंदिराचे काम अजून दोन वर्षे चालणार आहे. मंदिरासाठी दगड घडविण्याचे काम औरंगाबाद येथे चालते.

सकाळ वृत्तसेवा

Sundarnarayan Mandir : अहिल्यादेवी होळकर पुलाला लागून असलेल्या श्री सुंदरनारायण मंदिराचे काम अजून दोन वर्षे चालणार आहे. मंदिरासाठी दगड घडविण्याचे काम औरंगाबाद येथे चालते. मात्र वाहतुकीच्या दृष्टीने वेळ व पैसा दोन्हींचा अपव्यय होत असल्याने पुरातत्त्व खात्याने महापालिकेकडे जागेची मागणी केली असून, प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला. (nashik restoration of Sundarnarayan Temple marathi news)

पंचवटी व जुने नाशिक भागाला जोडणारा शंभर वर्षांहून अधिक जुना अहिल्यादेवी होळकर पुलानजीक अतिप्राचीन सुंदरनारायण मंदिर आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम २०१६-१७ पासून सुरू आहे. केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाने मंदिर जीर्णोद्धारासाठी १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

२०१७ मध्ये कामाचे कार्यारंभ आदेश तमिळनाडू येथील एका कंपनीला देण्यात आले. सुरवातीला प्राप्त निधीमधून गाभाऱ्याचे काम झाले. मंदिराच्या बाह्य भाग सजावटीचे काम निधी अभावी बंद होते. ऑक्टोबर २०२३ मध्ये केंद्र सरकारने ७ कोटी रुपये मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी नव्याने मंजूर केल्यानंतर पुन्हा काम सुरू झाले आहे.

मंदिराचा जीर्णोद्धार करताना दगड घडविण्याचे काम महत्त्वाचे आहे. सध्या मंदिरासाठी औरंगाबाद येथे दगड घडविण्याचे काम होत आहे. मात्र वाहतूक व खर्चाच्या दृष्टीने परवडणारे नाही. (Latest Marathi News)

त्यामुळे पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन दगड घडविण्यासाठी होळकर पुलाखालील संभाजी उद्यानाच्या बाजूची मोकळी जागेची मागणी केली आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. पुढील चार ते पाच दिवसात जागेचा प्रश्न मिटल्यानंतर याच जागेवर दगड घडविण्याचे काम सुरू होईल.

नव्याने सात कोटीचा निधी

पुरातत्त्व विभागाकडून श्री सुंदरनारायण मंदिराचा जिर्णोद्धार करण्यासाठी १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आला होता. परंतु, मंदिर जीर्णोद्धाराचा खर्च अधिक वाढल्याने काम थांबविण्यात आले होते. आता नव्याने सात कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आला.

त्यामुळे गती मिळाली, मात्र दगड आणण्याचे काम औरंगाबाद येथून होत असल्याने त्यास विलंब होत आहे. नाशिकमधून दगड घडविण्याचे काम सुरू झाल्यास पुढील दोन वर्षात मंदिराचे काम पूर्ण होईल, असा दावा करण्यात या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway traffic jam : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी; खंडाळा बोगद्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

Sugar Factory : कारखाने वर्षभर सुरू ठेवण्यासाठी हालचाली, मल्टिफीडसाठी ६३ कारखान्यांचा पुढाकार

T20 WC, IND vs NED: ...अन् मोठा अनर्थ थोडक्यात टळला! सूर्यकुमार - रिंकू सिंगची जोरात धडक अन् चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; Video

Chhatrapati Shivaji Maharaj:विदर्भभूमी शिवरायांच्या पदस्पर्शाने ६ वेळा पावन, आग्रा कैदेतून सुटल्यानंतर विदर्भातून प्रवास

SCROLL FOR NEXT