government hostel  esakal
नाशिक

Nashik News : मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश

Nashik : मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहातील रिक्त जागांसाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी १० वी चा निकाल लागल्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग अंतर्गत १२५ जयंती २५० मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहातील रिक्त जागांसाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी १० वी चा निकाल लागल्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी सर्व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास बी पी एल धारक, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ गरजूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृह प्रमुख व्ही. पी. बाबर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. ( Admission of backward class girls in government hostel )

इच्छुकांनी प्रवेश अर्ज वसतिगृहातून प्राप्त करून भरलेले परिपूर्ण अर्ज १५ जुलै २०२४ ते पुढील आदेशापर्यंत १२५ जयंती २५० मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह (नाशिक) येथे जमा करावयाचे आहेत. वसतिगृह प्रवेशासाठी अर्जासोबत गुणपत्रिका, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड प्रत, रहिवासी दाखला, बँक पासबुकची पहिल्या पानाची प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड/शैक्षणिक शुल्क भरणा पावती, गॅप सर्टिफिकेट (गॅप असल्यास) व रेशन कार्ड प्रत इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. (latest marathi news)

प्रवेश प्रक्रियेसाठी रिक्त जागा…

अनुसूचित जाती १० जागा, मातंग ८ जागा, मेहतर १० जागा, अनुसूचित जमाती ३ जागा, वि.जा.भ.ज. ४ जागा, इ.मा.व. निरंक , वि.मा.प्र ४ जागा, दिव्यांग ७ जागा, अनाथ ४ जागा व खास बाब १० जागा अशा एकूण ६० जागा आहेत.

सदर वसतिगृह हे के के वाघ इंजिनियरिंग कॉलेज, पंचवटी कॉलेज, भुजबळ कॉलेज, एम.व्ही पी कॉलेज या सर्व महाविद्यालयांपासून २ ते ५ किलोमीटरच्या अंतरावर आहे. वसतिगृहात पात्र विद्यार्थिनींसाठी सर्व सोयी-सुविधा, निवास, नाश्ता, दोन्ही वेळचे जेवण हे विनामुल्य आहे. याव्यतिरीक्त निर्वाह भत्ता प्रतिमाह रूपये ९०० हा विद्यार्थिनींना दिला जातो, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद केलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT