NMC Free Animal Ambulance esakal
नाशिक

NMC Free Animal Ambulance : नाशिक महापालिकेची प्राणी रुग्णवाहिका! भटक्या अन आजारी प्राण्यांची होणार सेवा

Nashik News : १३. २२ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली असून, पशू रुग्णवाहिकेसाठी टोल फ्री क्रमांकदेखील उपलब्ध करून दिला जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील मोकाट व भटक्या जनावरांना अपघात झाल्यास किंवा आजारी पडल्यास रुग्णालयापर्यंत त्यांची वाहतूक करण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आली आहे. १३. २२ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली असून, पशू रुग्णवाहिकेसाठी टोल फ्री क्रमांकदेखील उपलब्ध करून दिला जाणार आहे. (Nashik Animal Ambulance of NMC marath news)

शहरात मोठ्या प्रमाणात भटक्या व मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. रस्त्यावरील अपघातामुळे प्राण्यांवर उपचार करणे कठीण होऊन जाते. उपचार मिळत नसल्याने प्राणी गमावण्याची शक्यता अधिक असते. त्याचबरोबर आजारी असलेल्या प्राण्यांमुळे इतर प्राण्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते.

त्यामुळे वेळेवर उपचार होण्यासाठी महापालिकेकडून प्राण्यांची रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडून ही रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार असून यामुळे प्राण्यांवर उपचार करता येणार आहे. रुग्णवाहिकेत सलाईन, लसीकरण, प्राथमिक उपचाराचीदेखील सोय उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या रुग्णवाहिकेबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी तसेच चार कर्मचारी राहतील रुग्णवाहिकेद्वारे शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात प्राण्यांना उपचारासाठी नेले जाणार आहे, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने रेबीज लसीकरण मोहीम व प्राण्यांसाठी अन्य मोहिमा राबविल्या जातात, रुग्णवाहिकेच्या माध्यमातून यासाठी उपयोग होणार आहे.

प्राण्यांच्या रुग्णवाहिकाशी संपर्क करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून टोल फ्री क्रमांक जाहीर केला जाणार आहे. शहरात आजारी अपघातग्रस्त मोकाट व भटक्या जनावरांना उपचारासाठी कोणती क्रमांकाचा उपयोग होईल. टोल फ्री क्रमांकाची सेवा मोफत राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : अवघी पंढरी विठ्ठलमय! 20 लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल

मोदी सरकारचा एक निर्णय, 2 पालखी मार्गांसाठी मिळाले 12 हजार 41 कोटी! 365 किमी मार्गांमुळे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन सुलभ; पालखी मार्गांची वैशिष्ट्ये काय? वाचा...

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

SCROLL FOR NEXT