Nashik Accident  sakal
नाशिक

Nashik Accident : शिर्डी महामार्गावर अज्ञात वाहनाचा धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Latest Accident News : रात्री आठ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक देऊन केलेल्या अपघातात 25 वर्षीय दुचाकी स्वार तरुणाचा मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर मिरगाव शिवारात बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक देऊन केलेल्या अपघातात 25 वर्षीय दुचाकी स्वार तरुणाचा मृत्यू झाला. सागर राजेंद्र माळी हा पाथरे येथील आदिवासी वस्तीत राहणारा तरुण बुधवारी रात्री दुचाकीवरून वावी बाजूकडून पाथरेकडे जात होता. त्याला अज्ञात वाहणाने पाठीमागून धडक देऊन अपघात केला. (Bike rider died in collision with unknown vehicle on Shirdi highway )

या अपघाताची माहिती स्थानिकांनी टोल प्लाजावरील रुग्णवाहीकेस कळवली. रुग्णवाहिकेतून गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या सागर याला उपचारासाठी प्रारंभी कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डोक्याला गंभीर मार असल्याने व अतिरक्तस्राव होत असल्याने त्याला पुन्हा नाशिकला पाठवण्यात आले. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह पाठवण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT