भाजप कार्यालय तोडफोड प्रकरणी अखेर  Google
नाशिक

नाशिक : भाजप कार्यालय तोडफोड प्रकरणी अखेर शिवसैनिकांना जामीन

विनोद बेदरकर

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) कार्यालयावर हल्ला करणाऱ्या शिवसेनेच्या (Shiv Sena) कार्यकर्त्याना जामीन मंजूर झाला आहे. पंधरा हजाराच्या वैयक्तीक जात मुचलक्यावर त्यांना जामीन घेऊन सोडण्यात आले.



नगरसेवक दीपक दातीर (३१, रा. नवनाथनगर, दातीर मळा, अंबड), नितीन सामोरे (३५, स्वामी नगर, अंबड), योगेश चुंबळे (३४, रा. गौळाणे, ता. नाशिक), नगरसेविकेचे पती योगेश उर्फ बाळा दराडे (३३, रा. अश्विननगर, सिडको) आणि किशोर साळवे (२४, रा. नवनाथ नगर, अंबड) यांना नाशिक पोलिसांच्या गुन्हे शोध विभागाने अटक केली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द काढल्याने त्यावरुन राणे यांच्या विरोधात नाशिक शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर दीपक दातीर, बाळा दराडे यांच्यासह अन्य काही शिवसैनिकांनी भाजपाच्या एनडी पटेल रोडवरील कार्यालयावर दगडफेक केली. गुन्हा घडल्यानंतर हे संशयित थेट मुंबईला रवाना झाले. संबंधित संशयित आरोपींना अटक करण्याची मागणी करीत पोलिस आणि शिवसेनेने कट करून केंद्रीय मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करणे व इतर बाबी केल्याचा आरोप भाजपने केला होता.



मंगळवारी (ता.२४) ला कार्यालयावर हल्ला झाल्यापासून हल्लेखोर संशयित पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे शहर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभे केले गेले. शुक्रवारी सकाळी शिवसेना नेते संजय राऊत वृत्तवाहिन्यांना मुलाखत देत असताना दातीर आणि दराडे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे भाजपाने पोलिसांवर आगपाखड केली. त्यानंतर दोघे शिवसैनिक नाशिकमध्ये दाखल झाले. राजकीय दृष्टीकोनातून हे प्रकरण संवेदनशील बनत असल्याने पोलिसांनी शनिवारी सकाळी वरील सर्वांना अटक केली. या गुन्ह्याचा तपास सेंट्रल युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे करीत असून, संशयितांना आज सोमवारी (ता.३०) कोर्टात हजर करण्यात आल्यावर त्यांना वैयक्तीक जामीनावर सोडण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT