Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime: 500 रुपयाची लाच स्विकारणे आले अंगलट! दुय्यम निबंधक कार्यालयातील लिपिकासह तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : जनरल मुख्तारपत्र नोंदणी केलेला दस्त देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून ५०० रुपयांची लाच स्विकारतांना सह दुय्यम निबंधक वर्ग-२ मालेगाव कार्यालयातील लिपिक ज्ञानेश्वर खांडेकर (वय ३२) याच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. Nashik Bribe Crime Accept bribe of 500 rupees Three arrested including clerk in office of second registrar at malegaon)

कार्यालयातील डाटा एन्ट्री ऑपरेटर विठोबा शेलार (वय ३६) व एजंट दत्तू देवरे यांनी तक्रारदाराकडे पाचशे रुपयांची मागणी केली होती. दुय्यम निबंधक कार्यालयातील खाजगी व्यक्ती (एजंट ) दत्तू देवरे याने पंचासमक्ष ५०० रुपये लाचेची मागणी केली.

तसेच ज्ञानेश्वर खांडेकर यांच्या सांगण्यावरून व त्यांनी दिलेल्या अपप्रेणेमुळे श्री. शेलार यांनी सदर लाचेची रक्कम स्वीकारली. तिघांविरुध्द छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक नाना सूर्यवंशी, हवालदार सचिन गोसावी, पोलिस नाईक गणेश निंबाळकर, प्रमोद चव्हाणके, चालक परशुराम पवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मंत्री विखेंनी फडणवीसांचे ऐकून मराठा समाजाचे नुकसान केले; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, अंतरवालीत न येण्याचा इशारा

ST Bus: गणेशोत्सवासाठी लालपरी सज्ज! मुंबई, ठाणे, पालघरहून कोकणात जादा ५,२२० जादा एसटीची धाव

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Pithori Amavasya 2026: १० की ११ सप्टेंबर? पिठोरी अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, पूजेची पद्धत अन् महत्त्व!

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

SCROLL FOR NEXT