Jailed esakal
नाशिक

Nashik Bribe Crime: लाचखोर वनविभागाच्या दोघांना पोलीस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या तक्रारदारावर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात लाच घेणाऱ्या सातपूर वनविभागाचा वनपरिमंडळ अधिकारी व वनरक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता.२१) २० हजारांची लाच घेताना पकडले होते.

या दोघा लाचखोरांना न्यायालयाने येत्या शुक्रवारपर्यंत (ता.२४) दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Nashik Bribe Crime Two of bribe taking forest department in police custody)

वनपरिमंडळ अधिकारी शैलेंद्र आनंद झुटे (४८), वनरक्षक साहेबराव बाजीराव महाजन (५४) असे दोघा लाचखोरांची नावे आहेत. दोघांना बुधवारी (ता.२२) न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार यांचे हॉटेल हयात दरबार हे वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून अवैधरित्या बांधकाम करीत व्यवसाय करत असल्याचा आरोप दोघा संशयित लाचखोरांनी केला.

गत दहा वर्षांपासून वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण केल्याने व पुढील दहा वर्षे कारवाई न करण्याच्या मोबदल्यात दोघांनी तक्रारदाराकडे १ लाख रुपयांची लाच मागितली.

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता, पथकाने तक्रारीची शहानिशा करीत सापळा रचला. तडजोड करीत संशयितांनी ३० हजार रुपयांची लाच स्विकारण्यात तयारी दर्शवली.

त्यानुसार मंगळवारी (ता.२१) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून दोघांना २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation protest : महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले; महापौरांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, एक कर्मचारी जखमी

Pune Railway: पुणेकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १९ सप्टेंबरपासून १५ दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

जरांगेंची प्रकृती खालावली, वजन ७ किलोंनी घटलं तर शुगरही कमी झाली; मंत्र्यांच्या आश्वासनानंतर घेतले उपचार

Marathi News Live Updates : जरांगेंचा अल्टिमेटम, मुंबईत हालचालींना वेग; मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

Mumbai Goa Highway: उड्डाणपूल रखडला, कोंडी कायम; चिपळूणमधील सेवारस्त्यांवर गणेशोत्सवात वाहतुकीचा ताण

SCROLL FOR NEXT