नाशिक

कारची काच फोडून २० लाखांवर डल्ला

CD
कारची काच फोडून २० लाखांवर डल्ला राका कॉलनीतील घटना सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १८ : राका कॉलनीतील उद्यानासमोर पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी कारमधील २० लाखांची रोकड हातोहात लंपास केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय ठेकेदार अंबादास पोपट घुगे (रा. जेल रोड) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता. १७) सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास घुगे यांनी पंचवटीतील इंद्रकुंड परिसरातून मित्राकडून २० लाखांची रोकड घेतली आणि ते त्यांच्या कारमधून (एमएच १५ सीटी २८८८) दोन मित्रांसह राका कॉलनीतील राका उद्यानासमोर आले. सेंट्रल बँकेजवळ चहा पिण्यासाठी त्यांनी कार राका कॉलनीत पार्क केली आणि चहा पिण्यासाठी गेले. या दरम्यान अज्ञात दोन संशयितांनी त्यांच्या कारची डाव्या बाजूची काच फोडली आणि कारच्या सीटवरील २० लाखांची रोकड असलेली बॅग लंपास केली. घुगे हे चहा पिऊन परत आले असता, कारची काच फोडलेली होती आणि सीटवरील पैशांची बॅगही लंपास झाली होती. त्यांनी तत्काळ सरकारवाडा पोलिसांना खबर दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात दोन चोरटे निदर्शनास आले असून, त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Farmer Loan Waiver: साताऱ्यात ७,७८९ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित; कर्जमाफी होऊनही पात्रतेचा खोडा, धक्कादायक कराण आल समाेर!

सासऱ्यांनी सांगितलं एका वर्षाचा आत वजन घटव... कविता मेढेकर यांचा खुलासा, म्हणाल्या, 'माझे सासू-सासरे...'

Spinal Pain: पाठीच्या कण्याच्या आरोग्यासाठी कोणत्या कुशीवर झोपणे योग्य? पाठ टेकून झोपण्याचेही आहेत फायदे!

2026 च्या शेवटच्या 3 महिन्यांची बाबा वेंगांची भविष्य वाणी व्हायरल; ‘या’ राशींबाबत चर्चांना उधाण!

Latest Marathi News Live Update : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.७४ टक्के मतदान; ५,४०४ मतदारांचा सहभाग

SCROLL FOR NEXT