जोड
अपघातांचे सत्र सुरूच!
सिटी लिंक बसच्या अपघातात दोघे गंभीर
....
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : सातपूर येथे सिटी लिंक बसच्या धडकेत दोन दिवसांपूर्वी एक दुचाकीस्वार युवक ठार झाला, तर शुक्रवारी (ता. २३) वकील महिला ट्रकच्या धडकेत ठार झाल्याची घटना घडली. असे वारंवार अपघाताच्या घटना घडत असताना शुक्रवारी (ता. २४) रात्री अमृतधाम ते के. के. वाघ कॉलेज सर्व्हिस रोडवर सिटीलिंक बसचालकाने सिग्नल वा कोणतीही पूर्वसूचना न देता बस वळवल्याने झालेल्या अपघातात मोपेडवरील दोघेजण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...
पराग संजय पाटील (वय २१, रा. सिडको) हा मित्र श्रीधर प्रकाश कांगणे (वय २१, रा. अमृतधाम) याच्यासह शुक्रवारी रात्री आठ-साडेआठच्या सुमारास मोपेडवरून (एमएच १५ एफएस १४३०) अमृतधामकडून के. के. वाघ महाविद्यालयाकडे सर्व्हिस रोडने जात होते. त्याचवेळी त्यांच्या मोपेडसमोर धावणारी सिटी लिंक बसच्या (एमएच १५ जीव्ही ७८८२) चालकाने वळण घेत असल्याबाबतचा सिग्नल वा पूर्वसूचना न देता बस डावीकडे वळविली. अचानक सिटी लिंक बसने वळण घेतल्याने मोपेड बसला जाऊन धडकली. यात अपघातामध्ये मोपेडवरील दोघेही रस्त्यावर फेकल्या गेले. अपघातामध्ये पराग याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून, श्रीधरही गंभीर जखमी झाल्याने जागीच बेशुद्ध झाला होता. दोघांना नागरिकांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी पराग पाटीलच्या फिर्यादीनुसार, संशयित बसचालक कृष्णा देवराम गाडर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.