corona virus update esakal
नाशिक

नाशिक जिल्‍ह्यात दिवसभरात आढळले १४४ कोरोना बाधित

अरूण मलाणी

नाशिक : निर्बंध शिथिल झालेले असतांना बाजारपेठांमधील गर्दी, मास्‍क न वापरण्यासह नियमांकडील दुर्लक्षाचे परीणाम दिसू लागले आहे. गुरुवारी (ता.१२) जिल्‍ह्‍यात १४४ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. १०४ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. तर दोन बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत ३८ ने वाढ झाली असून, सध्या जिल्‍ह्यात एक हजार १२४ बाधितांवर उपचार सुरु आहेत.

उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या अकराशेपार

गुरुवारी नाशिक महापालिका क्षेत्रात ६३, नाशिक ग्रामीणमध्ये ७०, तर जिल्‍हा बाहेरील अकरा रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. जिल्‍ह्यात दोन बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला असून यापैकी प्रत्‍येकी एक नाशिक शहर व नाशिक ग्रामीणमधील आहे. गेल्‍या काही दिवसांपासून नव्‍याने आढळणाऱ्या बाधितांची संख्या व कोरोनामुक्‍त रुग्‍णांची संख्या सारखीच राहात होती. यामूळे जिल्‍ह्यात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्यादेखील एक हजारापर्यंत खालावली होती. मात्र आता नव्‍याने आढळणाऱ्या बाधितांच्‍या संख्येत वाढ होऊ लागल्‍याने उपचारार्थ रुग्‍णांची संख्या अकराशेहून अधिक झाली आहे.

दरम्‍यान सायंकाळी उशीरापर्यंत ८७६ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. नाशिक महापालिका क्षेत्रातील ५६७, मालेगावच्‍या १७१, तर नाशिक शहरातील १३८ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ४९१ रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ४७४ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात व डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्‍येकी दोन रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीण क्षेत्रातील तेरा रुग्‍णांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT