एक टन गोमांससह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त sakal
नाशिक

नाशिक : एक टन गोमांससह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

एकवीरा शाळेजवळ हॉटेल इंडियानाच्या पाठीमागे अवैध कत्तलखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

सकाळ वृत्तसेवा

सिडको : संजीवनगर भागातील एकवीरा शाळेजवळ हॉटेल इंडियाना पाठीमागे पोलिसांनी छापा मारून एक टन गोमांस, नऊ जिवंत गाई, दोन बैल, एक वासरू, असा २ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एकवीरा शाळेजवळ हॉटेल इंडियानाच्या पाठीमागे अवैध कत्तलखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला.

एक टन गोमांस, नऊ जिवंत गायी, दोन बैल, एक वासरू, एक चारचाकी वाहन (एमएच-१५- एएच- ७०६२), असा एकूण अडीच लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. संशयित अंजुम कुरेशी (४६, रा. बागवान पुरा), जमील खान (३५, रा. संजीवनगर ), फरान कुरेशी (२३, चौक मंडई), समीर खान ( (१९, संजीवनगर), सद्दाम खान (१८, रा. संजीव नगर) आरिफ खान (४८, रा. संजीवनगर), सुलतान कुरेशी (२८, भारतनगर), समीर कुरेशी (२०, भारतनगर, वडाळा), इरफान कुरेशी (३२, चौक मंडई), ख्वाजा कुरेशी (३२, रा. पंचशीलनगर, गंजमाळ) यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई अंबड ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप पाटील, बीट मार्शल तुषार देसले, गुन्हे शाखेचे चंद्रकांत गवळी, प्रमोद काशीद, संदीप लहाने यांच्या पथकाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT