crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : चोरट्यांकडून हस्‍तगत 24 लाखांचा मुद्देमाल परत; पंचवटी पोलिसांची कामगिरी

Nashik Crime : विविध गुन्‍ह्‍यांची उकल करताना संशयित चोरट्यांकडून हस्‍तगत केलेला मुद्देमाल पंचवटी पोलिसांनी फिर्यादीदार असलेल्‍या मूळ मालकांना परत केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : विविध गुन्‍ह्‍यांची उकल करताना संशयित चोरट्यांकडून हस्‍तगत केलेला मुद्देमाल पंचवटी पोलिसांनी फिर्यादीदार असलेल्‍या मूळ मालकांना परत केला आहे. शुक्रवारी (ता.१५) पोलिस ठाण्यात झालेल्‍या कार्यक्रमात आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्‍या उपस्‍थितीत २४ लाख १ हजार ९०८ रुपयांचा जप्त मुद्देमाल परत केला आहे. यामध्ये तब्‍बल १४ लाख २८ हजार ९०८ रुपये किमतीच्या शंभर स्‍मार्टफोनचा समावेश आहे. (Nashik Crime 24 lakh worth of stolen goods recovered from thieves by police marathi news)

पोलिस आयुक्‍त संदीप कर्णिक यांच्‍या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मालमत्ताविषयक गुन्‍हे उघडकीस आणले. तसेच गहाळ मोबाईलचा शोध घेण्यासाठी विविध पातळ्यांवर तपास करताना चोरीस गेलेला माल हस्‍तगत केला होता. गहाळ मोबाईल तांत्रिक विश्‍लेषण विभाग आणि सीईआयआर पोर्टलद्वारे हस्‍तगत केले आहेत.  (latest marathi news)

आमदार ॲड. राहुल ढिकले, पोलिस आयुक्‍त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्‍त किरणकुमार चव्‍हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्‍या उपस्‍थितीत झालेल्‍या कार्यक्रमात मुद्देमालाचे वाटप मूळ मालकांना करण्यात आले. मोबाईल फोन शोधण्यासाठी पंचवटी पोलिस ठाण्यातील कर्मचारी श्रीकांत साळवे, मंगेश काकुळदे, तांत्रिक विश्‍लेषण विभागातील पोलिस उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.

परत केलेल्‍या वस्‍तूंचा तपशील असा-

- सोने, चांदीचे दागिणे ४४.८ ग्रॅम---- १ लाख २१ हजार

- कार (१)-------------------६ लाख ५० हजार

- ऑटोरिक्षा (१)----------------------८० हजार

- दुचाकी---------------------१ लाख २२ हजार

- मोबाईल फोन (१००)-------------१४ लाख २८ हजार ९०८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Balen Shah: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह शंभर दिवसांमध्येच आले अडचणीत; सरकारविरोधात संघर्ष पेटला

IND vs ZIM 1st T20I: मयांक यादवने इतिहास रचला, पण कौतुक इशान किशनचे झाले! पहिल्याच चेंडूवर असे काय घडले? Video Viral

Ajit Pawar Statue: बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्यातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे भावपूर्ण लोकार्पण; तिरंगा सर्कलजवळ स्मृतीस्थळाला मान्यवरांची उपस्थिती

Latest Marathi Update : मुसळधार पावसामुळे मक्कासार गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण

Delhi Lathi Charge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा मोहोळमध्ये तीव्र निषेध; विविध पक्ष, संघटना व वकील संघटनेची भव्य रॅली

SCROLL FOR NEXT