crime esakal
नाशिक

Nashik Crime News : इंस्टाग्राम अकाउंटवरील फॉलोवर्सद्वारे आरोपी ताब्यात

Nashik Crime : एकास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांना अंबड एमआयडीसी पोलिसांनी इंस्टाग्रामच्या मदतीने २४ तासांच्या आत ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : एकास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांना अंबड एमआयडीसी पोलिसांनी इंस्टाग्रामच्या मदतीने २४ तासांच्या आत ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (ता.१७) रात्री साडेआठच्या सुमारास म्हाडा वसाहतीत बुद्ध विहारालगत राहणारे फिर्यादी किरण कुमावत यांना त्याच परिसरात राहणारे संशयित सागर सोनार याने जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांच्या साथीदारांना सोबत घेत चाकूचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. (Nashik Crime marathi news)

या प्रकरणी एमआयडीसी पोलिस चौकीमध्ये संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी संशयित सागर सोनार यास तत्काळ अटक केली होती. तर या गुन्ह्यातील संशयित विजय जाधव व एक विधी संघर्षित बालक फरार होता. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवरील फॉलोवर्सद्वारे माहिती घेऊन दोन्ही संशयितांना सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून ताब्यात घेतले.

ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप पवार, सुरेश जाधव, संदीप खैरनार, दिनेश नेहे, अनिल कोरडे, किरण सोनवणे, श्रीहरी बिराजदार, जनार्दन ढाकणे यांच्या पथकाने केली. ( latest marathi news )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwajeet Kadam Helicopter : कार्यकर्ता जपावा तर असा! वेळेअभावी आमदार विश्वजीत कदम थेट हेलिकॉप्टरने वास्तुशांतीला; गावात हेलिकॉप्टर येताच जल्लोष

Solapur Farmers: लिंकिंगच्या सक्तीमुळे आर्थिक लूट! युरियाचे २६६ रुपयांचे पोते ३५० ला; शेतकऱ्यांतून संताप व्यक्त

कोरोना लसीमुळे कॅन्सर अन् हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय? नाना पटोलेंच्या दाव्यात किती तथ्य; खरं काय जाणून घ्या

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT