crime esakal
नाशिक

Nashik Crime News : जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल

Nashik Crime : कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई सोमवारी (ता. ४) धारणगाव चौफुली येथे करण्यात आली. गोवंश कत्तलीसाठी निर्दयपणे सहा वाहनांमध्ये कोंबून आणि उपाशीपोटी नेत असताना, लासलगाव पोलिसांनी सहा वाहनांसह १८ लाख २० हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. (nashik Crime against transporting animals marathi news)

धरणगाव खडक चौफुली येथे चार बोलेरो आणि दोन छोटा हत्ती, अशा सहा वाहनांमध्ये २७ बैल व गायी निर्दयतीने कोंबून, उपाशीपोटी कत्तलीसाठी वाहतूक करताना लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सहा वाहनासह १८ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. (Latest Marathi News)

याबाबत पोलिस नाईक कैलास बिडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिंकदर धोंडू शेख (वय २२, रा. आहिल्यादेवीनगर, निफाड), रवींद्र सुरेश धुमाळ (२६, रा. जळगाव फाटा, निफाड), मोईद्दीन दादाभाई कुरेशी (४८, रा. आहिल्यादेवीनगर), साहेबराव दिनकर लोंढे (३०, रा. कोळवाडी, ता. निफाड), शुभम राजेंद्र सोनवणे (२०, रा. चिंचखेड रोड, माऊलीनगर पिंपळगाव बसवंत), महेश नवनाथ आल्हाट (२१, रा. उगाव रोड, निफाड), सुनील पंडित सोनवणे (२६, रा. बेघर वस्ती, उगाव रोड, ता. निफाड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दिल्लीतलं वातावरण तापलं! राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार 'गांधी स्मृतीस्थळा'वर दाखल

Pandharpur Wari Relief : आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा; आमदार प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्यानंतर हात दाखविलेल्या ठिकाणी थांबणार एसटी बस

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी बरसला अन् श्रेयस अय्यरचा कर्णधार म्हणून पहिला विजय; भारताची झिम्बाब्वेवर मात, मालिकेत आघाडी

Delhi Lathicharge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा बिडकीनमध्ये तीव्र निषेध; निलजगाव फाटा ते पोलिस ठाण्यापर्यंत विद्यार्थ्यांची पायी रॅली

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा आणखी एक विश्वविक्रम, १९८९ पासून सचिन तेंडुलकरच्या नावावर होता हा विक्रम...

SCROLL FOR NEXT