panipuriwala attacked esakal
नाशिक

Nashik Crime News : पाणीपुरी दिली नाही म्हणून लाकडी दांडक्याने केली मारहाण

Nashik Crime : सिडकोतील दत्त चौकामध्ये पाणीपुरी न दिल्याने दोघा संशयितांनी मारहाण करीत पाणीपुरीचा गाडा पलटी करून दिला.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सिडकोतील दत्त चौकामध्ये पाणीपुरी न दिल्याने दोघा संशयितांनी मारहाण करीत पाणीपुरीचा गाडा पलटी करून दिला. तसेच, व्यावसायिकाला लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत केल्याचा प्रकार बुधवारी (ता.२१) घडला. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime Beating with wooden stick at cidco marathi news)

दरम्यान, किरकोळ कारणांवरून शहरात सातत्याने मारहाणीच्या घटना घडत असून, पोलिस गस्त कमी झाल्याने असे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. अनिल भावराव लोणारे (५५, रा. दत्त चौक, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता. २१) दुपारी चार वाजेच्या सुमारास संशयित चेतन बाफना, वैभव राठोड यांना पाणीपुरी व बटाटा दिला नाही.

त्यावरून संशयितांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच, त्यांची पाणीपुरीचा गाडा पलटी करून खाद्यपदार्थांचे नुकसान करीत, लाकडी दांडक्याने लोणारे यांना मारहाण केली. याप्रकरणी दोघा संशयितांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव स्टॅण्ड परिसरात असलेल्या अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोर किरकोळ कारणावरून मारहाणीची घटना घडली.

रोहित सोमनाथ दाते (२३, रा. एरंडवाडी, पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे. सचिन दिलीप गायकवाड (रा. म्हाडा घर, एरंडवाडी, पंचवटी) या युवकाच्या फिर्यादीनुसार, दोघांमध्ये भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून संशयित रोहित याने रविवारी (ता. १८) रात्री साडेअकराच्या सुमारास सचिन यास शिवीगाळ करीत दगडाने मारून दुखापत केली.

याप्रकरणी पंचवटी पोलिसात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना सातपूरच्या महादेवनगरमध्ये घडली. घरावर लघुशंका करणार्यांना हटकल्याच्या कारणावरून संशयितांनी तिघांनी मारहाण केली. शरद गुंजाळ, अनिल गुंजाळ, चेतन गुंजाळ (सर्व रा. महालक्ष्मी चौक, महादेवनगर, सातपूर) अशी संशयितांची नावे आहेत.

कृष्णा संतोष वाघ (रा. महालक्ष्मी चौक, महादेवनगर) याच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता. २०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सदरचा प्रकार घडला असून, यप्रकरणी सातपूर पोलिसात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( latest marathi news )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT