Crime News esakal
नाशिक

Nashik Crime : इमारतीच्या डबक्यामधील गोणीत आढळला बेपत्ता महिलेचा मृतदेह; हत्या झाल्याचा संशय

Crime News : नाशिकरोड एकलहरे परिसरात सिडकोच्या युवकाची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच दुसर्‍यादिवशी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोणीमध्ये बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिकरोड : नाशिकरोड एकलहरे परिसरात सिडकोच्या युवकाची हत्या झाल्याची घटना घडली होती. ती घटना ताजी असतानाच दुसर्‍यादिवशी उपनगरमध्ये बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या तळमजल्यात गोणीमध्ये २३ वर्षीय बेपत्ता महिलेचा मृतदेह उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. (Nashik Crime missing woman dead body found marathi news)

सोनाली भानुदास काळे असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नाशिक-पुणे महामार्गालगत एलआयसी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या कारडा कन्स्ट्रक्शनच्या अर्धवट बांधकाम असलेल्या इमारतीमध्ये सोनाली काळे यांचा मृतदेह आढळून आला.

मृत सोनाली यांच्या कुटुंबियांनी त्या बेपत्ता झाल्याची तक्रार तीन दिवसांपूर्वी उपनगर पोलिसांत दाखल केली होती. त्यानुसार पोलीस तपास करत होते. सोमवारी (दि.19) सकाळी या इमारतीच्या तळमजल्यावरील एका डबक्याच्या गोणीत सोनाली यांचा मृतदेह आढळून आला. (Latest Marathi News)

सोनाली यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, घटनास्थळी धाव घेतली, गुन्हे शोध पथक व कर्मचाऱ्यांनी पंचनामा करुन महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT