crime esakal
नाशिक

Nashik Crime News : रास्तारोको करण्याऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Nashik Crime : मराठा आरक्षणासंदर्भात मखमलाबाद बस स्टॅण्ड येथे रास्ता रोको केल्यप्रकरणी आंदोलकांविरोधात म्हसरुळ पोलिस ठाण्यात ५० ते ६० आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मराठा आरक्षणासंदर्भात मखमलाबाद बस स्टॅण्ड येथे रास्ता रोको केल्यप्रकरणी आंदोलकांविरोधात म्हसरुळ पोलिस ठाण्यात ५० ते ६० आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन सुरू आहे. (Nashik Crime case has been registered against protestors marathi news)

या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी राज्यभर रास्तारोको आंदोलन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मखमलाबाद येथे आडगाव - त्र्यंबकेश्वर रोडवरील मखमलबाद बसस्टॅण्ड येथे आंदोलकांनी जमा होत रास्तारोको आंदोलन केले होते. रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी आंदोलकांनी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती.

पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरात जमावबंदीचा आदेश लागू आहे. आंदोलकांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता रास्तारोको करीत आंदोलन केल्याने याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात ५० ते ६० आंदोलकांविरोधात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी व रहदारीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलीस अंमलदार दीपक अरगडे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांच्या समावेश

नितीन रामभाऊ पिंगळे, शंकरराव निवृत्ती पिंगळे, संजय मधुकर फडोळ, मोतीराम दगूजी पिंगळे, सचिन पंडितराव पिंगळे, मदत पोपटराव पिंगळे, प्रभाकर तुळशीराम पिंगळे, तानाजी मुरलीधर पिंगळे, प्रदीप नामदेव पिंगळे, मधुकर मोतीराम पिंगळे, राजेश ज्ञानेश्वर पिंगळे, भास्करराव भिकाजी पिंगळे यांच्यासह ५० ते ६० आंदोलक.  (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

Birth Certificate Name Change Ban : जन्म-मृत्यू दाखल्यातील पूर्ण नावबदलाला मज्जाव; फक्त मात्रा, स्पेलिंग दुरुस्तीला परवानगी

Tamhini Ghat Closure: ताम्हिणी घाट बंद; दरडी, रस्ता खचल्याने रायगड-पुणे प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल, वेळ व खर्च दुप्पट

Roads Length Dispute: पुण्यात रस्त्यांची लांबीवर गोंधळ: पथ विभाग म्हणतो २३७१ किमी, घनकचरा विभागाचा दावा तब्बल ६८९२ किमी

POCSO Justice: पॉक्सो प्रकरणांतील चिमुकल्यांना जलद न्याय : सात वर्षांहून अधिक अनुभवी सरकारी वकिलांची विशेष नियुक्ती

SCROLL FOR NEXT