Nashik Fraud Crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : बडतर्फ सचिव काळे याला 5 दिवसांची पोलिस कोठडी! नाशिक बाजार समितीत अपहार प्रकरण

Nashik News : बनावट पावती पुस्तके छापून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची फसवणूक करून ९० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : बनावट पावती पुस्तके छापून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची फसवणूक करून ९० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. संस्थेच्या दप्तरात फेरफार करून संस्थेच्या नावाची बनावट पावती पुस्तके तयार करणे, त्या आधारे बाजार समिती शुल्काची रक्कम वसूल करून त्या सर्व रकमांच्या अपहार प्रकरणी पंचवटी पोलिसांनी तत्कालीन सचिव अरुण काळे याला अटक केली होती. (Nashik Fraud Crime)

बुधवारी (ता. ३१) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सोमवार (ता. ५)पर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. बाजार समितीच्या एकूण १२ पावती पुस्तकांचा गैरवापर करून त्यात खाडाखोड करणे, कृषी बाजार समितीच्या दप्तरात फेरफार करून त्याद्वारे एकूण ८९ लाख ७७ हजार २०० रुपयांचा अपहार केला.

या प्रकरणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश घोलप यांनी बाजार समिती कर्मचारी सुनील जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. संशयित जाधव याने प्रथम नाशिक न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. मात्र, तो न्यायालयाने फेटाळला होता. या गुन्ह्यात तत्कालीन सचिव संशयित अरुण काळे याने पोलिसांना तपासात सहकार्य केले नाही. (latest mmarathi news)

तसेच, न्यायालयात तारखेस वेळीच हजर न राहणे, न्यायालयात मागितलेली कागदपत्रे सादर न करणे, वेळोवेळी आदेश देऊनही त्याचे पालन न करणे या कारणांवरून न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी काळे याला ताब्यात घेण्यात आले होते.

काळेकडे अनेकांच्या नजरा

बाजार समितीतील अपहार प्रकरणात बडतर्फ सचिव अरुण काळे याच्या अटकेनंतर या प्रकरणात तो काय-काय खुलासे करतो, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. अपहार प्रकरणात अन्य कोणी कर्मचारी सहभागी आहेत का, याबाबत त्याच्याकडून काय माहिती मिळते, हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT