crime esakal
नाशिक

Nashik Crime News : बंदी असलेला गुटखा हेलिकॉप्टरने येतो का?

Nashik Crime : गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले गुटखा विक्रीविरोधी अभियान सुरू आहे. ग्रामीण भागात धास्ती घेतलेल्या विक्रेत्यांनी आस्ते कदम धोरण अवलंबले आहे.

सकाळ वृत्तसेवा

सुदर्शन सारडा : सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले गुटखा विक्रीविरोधी अभियान सुरू आहे. ग्रामीण भागात धास्ती घेतलेल्या विक्रेत्यांनी आस्ते कदम धोरण अवलंबले आहे. शहरातील खुलेआम पोलिसांना आव्हान देत आहे. शहरात येणारा गुटखा हेलिकॉप्टरने येतो का, असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही. मागील वर्षभरात आठशेच्या वर गुटख्याचे गुन्हे दाखल झाले. नऊशेवर संशयितांना अटक झाली. (Nashik Crime marathi news)

नवीन पोलिस अधीक्षक म्हणून विक्रम देशमाने यांनी पदभार स्वीकारला, तेव्हा यातील किंग लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडल्याबाबत चर्चा लपून राहिल्या नाहीत. श्री. देशमाने दहा वर्षांपूर्वी नाशिक ग्रामीणचे अप्पर अधीक्षक असताना, त्यांना हा भाग ठाऊक आहे. प्रत्येक अधिकाऱ्याची काम करायची पद्धत वेळी असल्याने श्री. देशमाने यांचे धोरण आणि कठोरता अद्याप समजलेली नाही.

गुटखा औचित्याचा मुद्दा असताना, दैंनदिन फेरीधारक अद्याप तरी ताक फुंकून पीत आहेत. गुटखाबंदी असताना, त्याची अंमलबजावणी कशी होते आणि नेमके धोरण निश्चित काय आहे, हे लवकरच समजेल.

कथित गुटखा किंगच्या मनी ‘दो लड्डू फुटे’

नवीन पोलिस अधिकारी पदभार स्वीकारायला येण्याआधीच यातील मुख्य किंग माफिया कुंडली काढत पाय पसरविण्यासाठी हालचाल करतानाचा स्थायीभाव नवीन नाही. मार्केटमध्ये सात ते आठ गुटखा ब्रँड चालतात. त्याचे वितरक म्हणून प्रत्येकी दोन ब्रँड ही किंग लोकं आपापसांत वाटून घेतात.

अंतर्गत यांच्यात मजबूत जोड असल्याने त्यांनीही ग्रामीण भागात आस्ते कदम म्हणत गोळाबेरीज करण्यासाठी काही दिवसांपूर्वी एकत्र आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. शहरात मात्र खुलेआम विक्री सुरू असून, ग्रामीण हद्दीत शहरात प्रवेशावर पोलिस प्रमुख ड्रोनसारखी नजर ठेवणार का, हा खरा प्रश्न आहे.

आजपर्यंत झालेली कारवाई

गुटखा केसेस : ११८

संशयित अटक : १३९

जप्त मालाची किंमत १,२४,७८,२४९ (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

Birth Certificate Name Change Ban : जन्म-मृत्यू दाखल्यातील पूर्ण नावबदलाला मज्जाव; फक्त मात्रा, स्पेलिंग दुरुस्तीला परवानगी

SCROLL FOR NEXT