fraud crime  esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : रेल्वेतील नियुक्तीचे दिले बनावट पत्र; 4 बेरोजगारांची 19 लाखांची फसवणूक

Fraud Crime : रेल्वेसह शासकीय विभागांमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून चौघा बेरोजगारांकडून पैसे उकळले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : रेल्वेसह शासकीय विभागांमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून चौघा बेरोजगारांकडून पैसे उकळले. त्यानंतर संशयितांनी चौघांना रेल्वेसह शासकीय विभागातील नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र देऊन त्यांची तब्बल १९ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी चौघे संशयितांविरोधात म्हसरुळ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Fake Railway Appointment Letter to 4 Unemployed 19 Lakh Fraud)

कैलास उत्तम चव्हाण (रा. बोरगड), श्रीकांत बापू आहिरे (रा ठेंगोडा, ता. सटाणा), सोमनाथ कृष्णा पवार (रा. लोणारे, ता. सटाणा), वसंत रमेश खांडवी ( रा. मेघराज बेकरीमागे, पेठरोड) अशी संशयितांची नावे आहेत. भूषण विलास खंबाईत (रा. निरगुडे, ता. पेठ) या युवकाच्या फिर्यादीनुसार, नोव्हेंबर २०१८ मध्ये संशयितांनी भूषण यांना रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी त्यांनी भूषण याच्याकडून पैसे घेतले होते.

त्याचप्रमाणे, अर्जून सीताराम बागुल (रा. उज्ज्वलनगर, बोरगड), योगेश अंबादास नाठे (रा. तिरडे कोपर्ली, ता. पेठ), जितेंद्र भास्कर जाधव (रा. पेठ) यांनाही संशयितांनी रेल्वे व शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडूनही पैसे घेतले. मात्र संशयितांनी या चौघांना बनावट नियुक्तीपत्र देत त्यांची फसवणूक केली. संशयितांनी चौघांकडून १८ लाख ८२ हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT