Crime esakal
नाशिक

Nashik Crime : बापलेक व्यावसायिकाला खंडणीसाठी मारहाण! खुटवडनगर येथील घटना; गुन्हा दाखल

Crime News : खुटवडनगर येथे व्यावसायिक बापलेकांना त्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ करीत मारहाण केली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : खुटवडनगर येथे व्यावसायिक बापलेकांना त्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच धंदा करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील अशी धमकी देत खंडणीची (Extortion) मागणी केली. याप्रकरणी संशयित मायलेकांविरोधात अंबड पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime marathi news)

सनी उर्फ मॉन्टी दळवी व त्याची आई अशी संशयितांची नावे आहेत. गणेश हिरालाल ठाकरे (रा. पौर्णिमा स्वीटमागे, खुटवडनगर, अंबड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित सनी हा गणेश यांचा मित्र आहे. परंतु त्यांच्या आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे. त्यातून त्यांच्या वाद झाले होते.

परंतु गेल्या रविवारी (ता. १८) रात्री साडेनऊ वाजता संशयित मॉन्टी व त्याची आई गणेश याच्या घरी गेले असता पुन्हा वाद झाले. त्यावेळी संशयितांनी गणेश ठाकरे व त्याचे वडील हिरालाल ठाकरे या बापलेकांना शिवीगाळ करीत मारहाण केली. यात त्यांचे अंगावरील कपडे फाडले. (Latest Marathi News)

तसेच, तुम्हाला भविष्यात धंदा करायचा असेल तर मला पैसे द्यावे लागतील अशी धमकी देत खंडणीची मागणी केली. याप्रकरणी अंबड पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अंमलदार उमाकांत टिळेकर हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

Maharashtra GAIL Project: आता वाऱ्यापासून वीज तयार होणार! गेल महाराष्ट्रात मेगा प्रकल्प उभारणार; पवनऊर्जा विस्ताराला बूस्ट मिळणार

Ajit Pawar, DGCA Report आला समोर, आदिती तटकरे थेट बोलल्या...

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT