Jailed esakal
नाशिक

Nashik Crime News : पोटच्या पोराला छताला लटकवून मारणाऱ्या पित्याला न्यायालयीन कोठडी

Latest Crime News : जन्मदात्या पित्याने सहा वर्षांच्या पोटच्या मुलाला छताला उलटं टांगून अमानुष मारहाण केल्याच्या या घटनेत पोलिसांनी तातडीने कारवाई करीत, पित्याला अटक केली होती.

सकाळ वृत्तसेवा

चांदवड : पत्नीला मारहाण करीत असताना सहा वर्षांच्या मुलगा मध्ये पडला म्हणून त्याला छताला उलट लटकविणाऱ्या पित्‍याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पत्नीला मारहाण करताना मुलगा मध्ये पडला म्हणून त्याला मारहाण करताना पित्याने मुलाला छताला उलट लटकविल्याचा प्रकार पुढे आला होता.

जन्मदात्या पित्याने सहा वर्षांच्या पोटच्या मुलाला छताला उलटं टांगून अमानुष मारहाण केल्याच्या या घटनेत पोलिसांनी तातडीने कारवाई करीत, पित्याला अटक केली होती. त्याला न्यायालयापुढे उभे केल्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली. (Father who beaten own son by hanging him)

धोतरखेडे (ता. चांदवड) येथील प्रकरणात मुलाची आई सुनीता मंगेश बेंडकुळे यांच्या तक्रारीवरून संशयित पिता मंगेश बेंडकुळे याच्या विरोधात वडनेरभैरव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी दिली. पोटच्या मुलाला मारताना जन्मदाता बाप इतका निर्दयी कसा होऊ शकतो असा प्रश्न पडतानाच या घटनेचा परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

संशयित मंगेश याचे बाहेर संबंध असल्याने त्यातून तो पत्नी सोबत भांडण करून लाथाबुक्यांनी मारहाण करीत असल्याची तक्रार आहे. हा प्रकार चिमुरड्या नीलेशला सहन होत नसल्याने त्याने आईला मारू नये म्हणून पित्याच्या मारहाणीत मध्ये पडून विरोध केला होता. त्यावेळी त्यालाही हाताचापटीने मारहाण करून त्याचे दोन्ही पाय दोरीने बांधून घराच्या छताच्या पाइपला पंधरा ते वीस मिनीटे उलटे लटकवून ठेवले होते. पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'ला अदाणींची साथ, जाहिरातीसाठी प्रायोजक म्हणून मंडळासोबत करार

IND vs SL 2nd Test: ४०० पार! ध्रुव जुरेल-रिषभ पंत यांचे अर्धशतक; यष्टिरक्षकाने मोडला MS Dhoni चा सर्वात मोठा विक्रम... बनला टॉपर

Narendra Modi Government : राहुल गांधी आणि ‘सीजेपी’चे सरकारपुढे आव्हान

Tamil Nadu LPG Scheme : सरकारचं महिलांना मोठं गिफ्ट ! वर्षाला ३ गॅस सिलिंडर फ्री, डिलक्स बसचा प्रवासही मोफत... मुख्यमंत्र्यांची थेट घोषणा

Pune Bus Accident : पुण्यात बसखाली चिरडून कॉलेज विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू, माणिकबाग परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT