Murder News esakal
नाशिक

Nashik Crime News: खून झालेल्या युवकाची पटली ओळख; गंगापूर पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू

Crime News : गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅनॉल परिसरातील पडीक जागेमध्ये आढळून आलेल्या युवकाच्या मृतदेहाची ओळख पटली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅनॉल परिसरातील पडीक जागेमध्ये आढळून आलेल्या युवकाच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. आसिफ फरिक शेख (३९, रा. वेताळबाबा मंदिराजवळ, सातपूर) असे मयत युवकाचे नाव असून त्याच्या पोटात चाकू वा तीक्ष्ण हत्याराने खुपसून खून करण्यात आला आहे. (Nashik Crime gangapur road canal Murdered youth case marathi news)

गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. १९) सायंकाळी मोतीवाला कॉलेजसमोरील चौफुलीकडून सुला वाईनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कॅनॉललगतच्या पडीक जागेत आसिफचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या पोटात चाकू वा तीक्ष्ण हत्याराने खुपसून त्याचा खून करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे.

मयत फिरस्ता असून, भंगार गोळा करीत असल्याचे पोलीस तपासातून समोर आले. त्यानुसार पोलिसांनी सातपूर परिसरात त्याच्या फोटोवरून त्याची ओळख पटविली. मात्र अद्याप त्याचा खून कोणी व का केला असावा याचा पोलीस शोध घेत आहेत. (Latest Marathi News)

दरम्यान, या रस्त्यावर कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने तपासात अडचणी येत आहे. त्यामुळे पोलिसांनी पारंपरिक तपासावर भर दिला असून, मयत आसिफच्या संपर्कातील भंगार गोळा करणाऱ्यांकडे चौकशी केली जात आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

Burnt Cash Found Kolkata : पश्चिम बंगालमध्ये कोट्यवधींच्या जळालेल्या नोटा सापडल्याने खळबळ! सुटकेसमध्ये भरलेला पैसा; टीएमसी नेत्याशी काय आहे कनेक्शन?

रोटरी क्लबच्या 'गिफ्ट ऑफ लाइफ'चा चमत्कार! ८५० मुलांच्या हृदयावर मोफत शस्त्रक्रिया; सुनील गावस्कर भावूक

Shendurwada News : डॉ. प्रशांत पटारे यांचा रोबोटिक शस्त्रक्रियांचा विक्रम! एका दिवसात १६ रोबोटिक शस्त्रक्रिया; आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद....

SCROLL FOR NEXT