Nashik Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : 3 लाखांसाठी विवाहितेचा छळ!

Nashik News : तीन लाखांची रोख रक्कम आणि दहा तोळे सोने मागणी करत विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ करण्यात आला. भद्रकाली पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तीन लाखांची रोख रक्कम आणि दहा तोळे सोने मागणी करत विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ करण्यात आला. भद्रकाली पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. देवळाली गाव येथील संशयित अल्ताफ युसूफ कुरेशी यांच्याशी सुमारे आठ वर्षांपूर्वी पीडितेचा विवाह झाला होता. (Harassment of married woman for 3 lakhs)

काही वर्ष संसार सुरळीत चालल्यानंतर पती, सासरे, सासू, जेठ, जेठानी यांनी वेळोवेळी विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ केला. तीन लाख रुपये रोख रक्कम आणि दहा तोळे सोने माहेरून आणण्यास जबरदस्ती केली. नकार दिल्याने शारीरिक मानसिक छळ सुरू ठेवला.

दरम्यान जेठ याने विवाहिता घरात एकटे असताना तिच्याशी अंगलटीचा प्रयत्न केला. मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. (latest marathi news)

पती आणि सासू-सासऱ्यांना सांगितले असता त्यांनी तिलाच शिवीगाळ करत मारहाण केली. वारंवार झालेल्या त्रासास कंटाळून पती अल्ताफ कुरेशी, जैनब कुरेशी, युसुफ कुरेशी, जेठ युनुस कुरेशी, जेठाणी सलमा कुरेशी अशा पाच जणांच्या विरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खुल्या जागेत कुर्बानी होऊ देणार नाही; धर्माच्या नावाखाली कत्तल सहन करणार नाही, बकरीदपूर्वी भाजप नेत्याचे BMC ला पत्र

Retired Teacher Donation: सेवानिवृत्त शिक्षिकेची एक कोटींची देणगी; विजयाताई वैद्यांचा सैनिकांच्या कल्याणासाठी प्रेरणादायी त्याग

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT