Nashik Cyber Crime sakal
नाशिक

Nashik Cyber Crime : स्टॉक ट्रेडिंगमधील गुंतवणूक पडली महागात! सायबर भामट्यांकडून 82 लाखांना गंडा

Nashik News : व्हॉटसॲपवरून सायबर भामट्यांनी स्टॉक ट्रेडिंगच्या माध्यमातून जादा नफा कमवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील तीन महिला व दोन पुरुष गुंतवणूकदारांना तब्बल ८२ लाखांना गंडा घातला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : व्हॉटसॲपवरून सायबर भामट्यांनी स्टॉक ट्रेडिंगच्या माध्यमातून जादा नफा कमवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील तीन महिला व दोन पुरुष गुंतवणूकदारांना तब्बल ८२ लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्यांनी नाशिक सायबर पोलिसात धाव घेत फिर्याद दिली आहे. (Nashik Cyber Crime)

सायबर भामट्यांनी मार्च ते मे २०२४ या तीन महिन्यांत तक्रारदारांना सेम टू सेम स्कीम सांगून गंडा घातला आहे. संशयित सायबर भामट्यांनी तक्रारदारांना विविध व्हॉट्सअॅप क्रमांकावरून संपर्क साधला आणि नामांकित स्टॉक मार्केट कंपनीचे ब्रोकर असल्याचे भासविले. त्याचप्रमाणे, वारंवार चॅटिंग करून शेअर मार्केट, त्यातील गुंतवणुकीतून जादा आर्थिक परतावा याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर , https://stock-essencefunds-com ही लिंक स्टॉक मार्केट ट्रेडिंगमधून कशा पद्धतीने नफा मिळाला आहे, असे व्हिडिओ, फोटोज्, चॅटिंग शेअर केली. त्यावर विश्वास ठेवून गुंतवणूक केली. संशयित भामट्यांनी काही प्रमाणात आभासी नफा दाखविला. यातच पाचही तक्रार फसले आणि गुंतवणूक करीत गेले. फिर्यादी महिलेने ३२ लाख ८५ हजार रुपये संशयितांच्या विविध बँक खात्यांत वर्ग केले. (latest marathi news)

मात्र, आभासी दिसणारी रक्कम काढता येत नसल्यावर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. अशारीतीने सायबर भामट्यांनी आणखी दोन महिला व दोघा युवकांना गंडा घातल्याचे समोर आले. गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.

यांची फसवणूक :

फिर्यादी महिला : ३२ लाख ८५ हजार रुपये

दीपाली कदम : ५ लाख २३ हजार रुपये

शरद चिंचोळे : २७ लाख ४५ हजार रुपये

सोमनाथ शेवाळे : ८ लाख २३ हजार रुपये

नीता मगर : ८ लाख ५७ हजार रुपये

एकूण : ८२ लाख ३४ हजार रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: MPSC पेपरफुटी चौकशी समितीची घोषणा, पण तुकाराम मुंढेंना अद्याप लेखी आदेशच नाही

SCROLL FOR NEXT