Murder of friend for Rs 500 esakal
नाशिक

Nashik Crime News : 500 रुपयांवरून मित्राचा खून!

Nashik News : पाचशे रुपयांवरून झालेल्या वादात मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना भारतनगर परिसरात बुधवारी (ता. १९) रात्री अकरा ते साडेअकराच्या सुमारास घडली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पाचशे रुपयांवरून झालेल्या वादात मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना भारतनगर परिसरात बुधवारी (ता. १९) रात्री अकरा ते साडेअकराच्या सुमारास घडली. पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे. परवेज शेख असे मृताचे नाव आहे. आठ दिवसांत शहरातील खुनाची तिसरी घटना आहे. (Murder of friend for Rs 500)

संशयित इब्राहिम सय्यद याने परवेज शेख भारत याच्याकडे मोबाईल गहाण ठेवला होता. बुधवारी (ता. १९) रात्री साडेदहाच्या सुमारास संशयित इब्राहिम सय्यद मोबाईल सोडविण्यासाठी परवेज याच्याकडे आला. गहाण ठेवलेल्या रकमेतील पाचशे रुपयांवर दोघांमध्ये वाद झाले.

वादादरम्यान संशयिताने त्याच्याकडील धारदार शस्त्राने परवेज याच्यावर वार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतात पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती घेत तत्काळ त्यांनी संशयितास ताब्यात घेतले. (latest marathi news)

मुंबई नाका पोलिस ठाण्यात इब्राहिम सय्यद याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. परवेज आणि संशयित इब्राहिम दोघेही मित्र आहेत. संशयितास पैशांची आवश्यकता भासल्याने त्याने त्याचा मोबाईल मित्र परवेजकडे गहाण ठेवला होता.

मोबाईल सोडविण्यासाठी संशयित सय्यदने परवेजची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यात पाचशे रुपयांवरून वाद उफाळून आला. त्यातून संशयिताने स्वतःच्या मित्राची हत्या केली, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT