Court Order esakal
नाशिक

Nashik Crime News : गोमांस तस्करांची दीड वर्षांसाठी तडीपारी; पोलीस उपायुक्तांची कारवाई

Crime News : शहर परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सदरचे आदेश बजाविले असून, यामुळे शहरात गोमांसाची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गोवंशीय जनावरांची हत्त्या करण्यास बंदी असताना, या आदेशाचे उल्लंघन करून गोवंशीय जनावरांची हत्त्या करून गोमांसाची अवैधरित्या तस्करी व विक्री करणाऱ्या १० संशयितांना शहर - जिल्ह्यातून दीड महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. शहर परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सदरचे आदेश बजाविले असून, यामुळे शहरात गोमांसाची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (Nashik Crime News Beef smugglers tadipar marathi news)

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये गोमांस तस्कारांविरोधात धडक कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहेत. असे असले तरीही गोमांस तस्करांकडून चोरीछुप्यारितीने गोमांस आणून त्याची विक्री करण्याचे प्रकार सुरू होते.

त्याविरोधात शहर गुन्हेशाखांच्या पथकांनी कारवाई केली आहे. गेल्या दोन महिन्यात गोहत्त्या व गोमांस विक्रीचे १६ गुन्हे आयुक्तालय हद्दीमध्ये दाखल आहेत. यात सर्वाधिक कारवाई ही भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्या आहेत. त्यानुसार, गुन्हे दाखल करून अटक करण्यात आलेल्या गोमांस तस्करांविरोधात हद्दपारीच्या कारवाईचे आदेश आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले होते.  (latest marathi news)

त्यानुसार, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी हद्दपारीचे प्रस्ताव केले. त्या प्रस्तावांची अंमलबजावणीचे आदेश उपायुक्त चव्हाण यांनी जारी केले आहेत. त्यानुसार १० गोमांस तस्करांना शहर-जिल्ह्यातून दीड वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

तडीपार गोमांस तस्कर

सदाम कय्युम उर्फ बबलू कुरेशी, शोएब समद कुरेशी, इम्रान रमजान खान, इरफान नूर कुरेशी, सादीक मुश्ताक कुरेशी, मोहम्मद जोहेब अस्लम कुरेशी, जावेद रहीम कुरेशी, दानिश रहीम कुरेशी, जोहेब उर्फ सोनू समद कुरेशी, अंजूम बिस्मील्ला कुरेशी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाकरे गटातील नेत्याला मारण्यासाठी चोरबाजारातले चॉपर अन् देशी पिस्तुलचा वापर, प्रदीप पूर्णेकर हत्याकांडात धक्कादायक माहिती समोर!

IND A vs NZ A Live : W,W,W... १ धाव ३ विकेट्स; गंभीरने ज्याला कमी लेखले, त्याने मॅच फिरवली; शेवटच्या षटकांत नाट्यमय घडामोडी

ITBP Foundation Day: आयटीबीपी स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान मोदींकडून हिमवीरांच्या शौर्याचे कौतुक

Latest Marathi News Live Update : कोरड्या कृष्णा नदीपात्रात राजू शेट्टी यांचे ठिय्या आंदोलन

Jal Jeevan Mission: आता खेड्यातही नळाच्या पाण्यावर पाणीपट्टी, देखभाल दुरुस्तीसाठी ग्राम समित्यांकडे जमा होणार निधी

SCROLL FOR NEXT