crime esakal
नाशिक

Nashik Crime News : सोशल मीडियावर अश्लिल चित्रफिती; सायबर पोलिसात गुन्हा

Nashik Crime : समाज माध्यमांवर आक्षेपार्ह, अश्लिल मजकूर व चित्रफिती अपलोड करून त्या प्रसारित करणे कायदेशीर गुन्हा आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : समाज माध्यमांवर आक्षेपार्ह, अश्लिल मजकूर व चित्रफिती अपलोड करून त्या प्रसारित करणे कायदेशीर गुन्हा आहे. असे असतानाही समाज माध्यमांच्या विविध सोशल मीडियावर लहान मुलांचे अश्लिल व्हिडिओंसह अनेक प्रकारच्या अश्लिल चित्रफिती व्हायरल करणार्या सुमारे ३३ प्रोफाईल धारकांविरोधात नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ()

शाळा, महाविद्यालयीन मुलांच्या हातात स्मार्टफोन्स पोहोचले आहेत. स्मार्ट फोनमुळे बहुतांशी विषयांची माहिती क्षणात उपलब्ध होत आहे. यावरून अनेक विषयांची अभ्यासू माहिती जशी सहज मिळते, तशीच गैरमार्गी माहितीही मिळते. त्यामुळे बहुतांशी तरुणाई ही जिज्ञासावृत्तीतून विषयांची माहिती घेण्याऐवजी गैरप्रवृत्तीच्या माहिती मिळविण्यासाठीच स्मार्ट फोनचा वापर करताना आढळून येते.

परिणामी, सोशल मीडियावरील विविध साईटस्‌वर अश्लिल व आक्षेपार्ह मजकूर व्हायरल होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. असा मजकूर समाज माध्यमांवर व्हायरल करणे कायदेशीर गुन्हा असतानाही असा मजकूर, चित्रफिती मोठ्याप्रमाणात व्हायरल होत असतात.

नाशिक सायबर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रतिक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोशल मीडियाच्या फेसबुक, इंन्स्टाग्राम, व्हॉटसॲप, गुगल, स्नॅपचॅट यासारख्या विविध समाज माध्यमावंरील ३३ प्रोफाईल धारकांनी चाईल्ड प्रोनोग्राफी, बलात्कार, सामुहिक बलात्कार, आक्षेपार्ह / अश्लिल असा मजकूर व चित्रफिती व्हायरल केला आहे.

यासंदर्भात तपास करीत सायबर पोलिसांनी गोपनीयरित्या या प्रोफाईलधारकांची माहिती पुराव्यांसह प्राप्त केली आहे. सदरचा प्रकार जानेवारी २०२१ ते जून २०२१ या दरम्यानचा आहे. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००चे कलम ६७(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, थांबलेल्या ट्रकला कारची धडक; माय-लेकीचा मृत्यू, बाप-लेक गंभीर जखमी

Gokul Dudh Sangh Politics : मुश्रीफांना घेऊनच महायुतीचे पॅनेल, आमदार शिवाजी पाटील यांचा पत्ता कट?; गोकुळच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना मोठा धक्का ! ८० लाख महिलांचा लाभ बंद, आता ई-केवायसीलाही मुदवाढ नाही; नेमकं कारण काय?

Rajesh Tope: शरद पवार गटाला धक्का? राजेश टोपे खरंच भाजपमध्ये जाणार? अखेर स्वतः टोपेंनीच दिलं स्पष्ट उत्तर!

Konkan Railway: ‘वंदे भारत’, ‘तेजस’च्या फेऱ्यांत १५ जूनपासून कपात; कोकण रेल्वे मार्गावर मॉन्सून वेळापत्रक, गाड्यांच्या वेळाही बदलणार

SCROLL FOR NEXT