Stolen bikes, police team with suspect. esakal
नाशिक

Nashik Crime News : दुचाकी चोरट्याला अटक, घेणाऱ्यांना सोडले; नागरिकांमध्ये संभ्रम

Nashik Crime : चोरीच्या दुचाकी व बुलेट विकत घेणारे इगतपुरी तालुक्यात अनेक जण आहेत. राजूर पोलिसांनी तब्बल दोन बुलेट आणि आठ रेसर दुचाकी, असा १० लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : राजूर, भंडारदरा परिसरात दुचाकींची चोरी करणाऱ्यांसह इगतपुरी, घोटी, वाडीवऱ्हे, आंबेवाडी, कावनई, उभाडे येथील विकत घेणाया सहा-सात संशयितांना शनिवारी (ता. १७) राजूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, दुचाकी घेणाऱ्यांना का सोडले, असा प्रश्न जनसामान्यांतून उपस्थित होत आहे. (Nashik Crime bike thief marathi news )

चोरीच्या दुचाकी व बुलेट विकत घेणारे इगतपुरी तालुक्यात अनेक जण आहेत. राजूर पोलिसांनी तब्बल दोन बुलेट आणि आठ रेसर दुचाकी, असा १० लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मुख्य सुत्रधार शंकर एकनाथ गांगड (रा. उभाडे, ता. इगतपुरी) याला गजाआड केले.

राजूर (ता. अकोले) येथील चंद्रकांत गंगाधर भडांगे व (भंडारदरा) शेंडी येथील संतोष पवार यांच्या बुलेट चोरीप्रकरणी राजूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यावरून संगमनेरचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांनी घटनास्थळी भेटी देऊन गुन्हा करण्याची कार्यपद्धती पाहिली.

शेंडी व राजूर गावातील सीसीटीव्ही फुटेज व खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून श्री. सरोदे व पोलिस पथकाने घोटी (ता. इगतपुरी) येथून संशयित शंकर गांगड यास ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने राजूर व शेंडी येथील दोन बुलेट साथीदारांसोबत चोरी केल्याची कबुली दिली.

त्याच्याकडून दोन्ही बुलेट व आठ रेसर दुचाकी, असा १० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे, उपनिरीक्षक शेख, पोलिस कर्मचारी अल्ताफ शेख, विजय मुंढे, कैलास नेहे यांनी ही कामगिरी केली. ( latest marathi news )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT