crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : राहुल गांधींच्‍या रोड शोदरम्‍यान 3 लाख 63 हजारांचा ऐवज चोरीला

Nashik Crime : काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्‍या शहरात झालेल्‍या रोड शोदरम्‍यान गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हातसाफ केला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्‍या शहरात झालेल्‍या रोड शोदरम्‍यान गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हातसाफ केला. यासंदर्भात पोलिस दप्तरी नोंद झाल्‍यानंतर चोरीस गेलेल्‍या ऐवजाची रक्‍कम समोर आली आहे. त्‍यानुसार चोरट्यांनी ३ लाख ६३ हजार रुपयांहून अधिकचा ऐवज लांबविल्‍याचे निदर्शनास आले आहे. (Nashik Crime Rahul Gandhi road show stolen worth 3 lakh 63 thousand marathi news)

यासंदर्भात भद्रकाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. त्‍यानुसार बांधकाम साहित्‍याचे पुरवठादार राजू कापसे यांनी फिर्याद दिली आहे. त्‍यानुसार गुरुवारी (ता.१४) ते रोड शोमध्ये सहभागी झाले होते. द्वारका भागातील राधिका हॉटेल परिसरात भामट्यांनी त्‍यांच्‍या खिशातील पाकिट लांबविले. (latest marathi news)

त्‍यांच्‍यासह इतर काहींच्‍या खिशाला कात्री लावताना चोरट्यांनी सुमारे ३ लाख ६३ हजार ७०० रुपये किमतीचा ऐवज चोरल्‍याचे भद्रकाली पोलिस ठाण्यात नोंदविले आहे. चोरीला गेलेल्‍या वस्‍तूंमध्ये पाकिट, मोबाईल, रोख रक्‍कम तसेच दागिन्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पावसाची प्रतिक्षा कायम! पुढचे काही दिवस पाऊस नाही? हवामान विभागाचा अंदाज काय?

Karnataka Accident: राज्यात दोन अपघातांत सात जण ठार; कोलार, चिक्कबळ्ळापुरात दुर्घटना, तिरुपतीहून परतताना काळाचा घाला

IND vs AFG : अफगाणिस्तानच्या 'त्या' कृतीने पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या! भारताचा नकाशा अन् जगासमोर आणले सत्य… नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : BMCची उधळपट्टी, ४ मिनिटांच्या माहितीपटासाठी ६ लाखांचा खर्च

Shaktipeeth Highway: 'कोणाचा बाप आला तरी जमिनी देणार नाही’; शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, मोजणीच्या नोटिसींची होळी

SCROLL FOR NEXT