Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : शेतमालाची वाहतूक करणाऱ्या पीकअपवर ‘आरटीओ’ची कारवाई

Crime News : गुरुवारी (ता. १८) सकाळपासून प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) पथकांनी अशा पिकअप वाहनांवर अतिभार वाहून नेत असल्याच्या कारणावरून हजारो रुपयांचा दंड ठोठावत कारवाई केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : नाशिकच्या दिंडोरी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यातूनच नव्हे तर परजिल्ह्यातून शेतीमाल विक्रीसाठी पिकअप येत असतात. परंतु गुरुवारी (ता. १८) सकाळपासून प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) पथकांनी अशा पिकअप वाहनांवर अतिभार वाहून नेत असल्याच्या कारणावरून हजारो रुपयांचा दंड ठोठावत कारवाई केली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून आरटीओ अधिकाऱ्यांकडून मात्र या शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. ( action on pickups transporting agricultural goods)

दिंडोरी रोडवर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. याठिकाणी शहरालगतच्या शेतकऱ्यांसह परजिल्ह्यातील शेतकऱ्याकडून शेतीमाल विक्री आणला जातो. तसेच, लगतच्या शहरांमध्ये येथून शेतीमाल विक्रीसाठी नेला जातो. यासाठी शेतकरी व विक्रेत्यांकडून शेतीमाल नेण्यासाठी पिकअपचा वापर केला जातो.

मात्र, आरटीओ अधिकाऱ्यांच्या विविध पथकांनी गुरुवारी (ता. १८) सकाळपासून दिंडोरी रोड, पेठरोड, पुणे रोड यासह काही ठिकाणी नाकाबंदी करीत शेतीमालाची वाहतूक करणार्या पिकअप वाहनांना अडविण्यात आले आहेत. तसेच, पिकअपमध्ये प्रमाणापेक्षा जादा माल असल्याचे कारण देत ही वाहने थेट पेठरोडवरील आरटीओ कार्यालयात आणण्यात आली आहेत. (latest marathi news)

या वाहनांवर २४ ते ५४ हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात आला आहे. दंडाचा आकडा पाहून वाहनचालकांनी शेतकर्यांना संपर्क साधला असता, काहींनी आरटीओ कार्यालयात धाव घेतली. यावेळी काहींनी आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्याकडे दंडाच्या रकमासंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी दंडाची रक्कम भरून पिकअपमधील शेतीचा माल दुसऱ्या वाहनात भरून घेतल्यानंतर वाहन सोडणार असल्याचे सांगितले. यामुळे शेतकरी, व्यावसायिकांसह वाहनचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

‘त्या’ वाहनांना मुभा कशी?

एकीकडे पिकअपमध्ये शेतमाल असताना तो प्रमाणापेक्षा जादा असल्याचे (ओव्हरलोड) सांगत हजारो रुपयांचा दंड आरटीओ अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. मात्र, त्याचवेळी क्षमतेपेक्षा जादा वाळू, खडी, मुरुम, कच वाहून नेणाऱ्या वाहनांवर मात्र आरटीओ अधिकाऱ्यांकडून कोणतीच कारवाई होत नाही असा सवाल करीत, त्या वाहनांना मुभा देण्यात आलेली आहे का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT