Hookah women file photo esakal
नाशिक

Nashik Crime: ‘त्या’ महिलेच्या धिंगाण्याची गावभर चर्चा! हुक्का पार्टीवर कारवाई केल्याने ‘राजकीय’ दबावाचा प्रयत्न

Crime News : तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोवर्धन शिवारात हॉटेल द फॉरेस्ट याठिकाणी अवैधरीत्या सुरू असलेल्या मद्य व हुक्का पार्टीवर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोवर्धन शिवारात हॉटेल द फॉरेस्ट याठिकाणी अवैधरीत्या सुरू असलेल्या मद्य व हुक्का पार्टीवर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईविरोधात गंगापूर रोड परिसरातील एका महिलेने तालुका पोलिस ठाणे (Police station) गाठून राजकीय दबाव आणत धिंगाणा घातला.

तर या महिलेच्या मदतीला एका लोकप्रतिनिधीचा स्वीय सहायकही धावून आल्याने अनेकांच्या भुवया तर उंचावल्याच परंतु ही चर्चा गावभर झाल्याने पोलिसांना हे प्रकरण सावरता-सावरता नाकीनऊ मात्र आले. (Nashik Crime hookah parties case marathi news)

गोवर्धन शिवारात हॉटेल द फॉरेस्ट असून, याठिकाणी अवैध मद्य पार्ट्या तसेच अवैध हुक्काही ग्राहकांना पुरविला जात असल्याच्या आरोपावरून यापूर्वीही या हॉटेलवर ग्रामीण पोलिसांनी कारवाई केलेली आहे. दरम्यान, शनिवारी (ता.१७) मध्यरात्रीच्या सुमारास ‘टीप’ मिळताच तालुका पोलिसांच्या पथकाने या हॉटेलवर धाड टाकली.

त्यावेळी याठिकाणी अवैध मद्यपार्टी व एका खोलीमध्ये हुक्का पार्टी सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास गंगापूर रोड परिसरातील एका महिलेने तालुका पोलिस ठाणे गाठले आणि अर्वाच्च्य भाषेत पोलिसांना जाब विचारू लागली. (Latest Marathi News)

‘आप जानते नहीं, आपने किससे पंगा लिया हैं’ अशा भाषेत या महिलेने पोलिसांना धमकावत राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तर काही वेळातच एका लोकप्रतिनिधीच्या स्वीय सहायकानेही तालुका पोलिस ठाण्यात हजेरी लावत हॉटेलविरोधातील कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला.

मात्र पोलिसांत नोंद झालेली असल्याने काही करता आले नाही. परंतु हॉटेलमध्ये सुरू असलेल्या पार्टीतील कोणाचीही नोंद पोलिस दप्तरी होऊ शकलेली नाही. याबाबत मात्र गूढ कायम आहे. हॉटेलमध्ये अवैध मद्यसाठा, हुक्काचे साहित्य, प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचे साहित्य सापडले परंतु पोलिसांना ग्राहक सापडले नाहीत का, की हे साहित्यच फक्त हॉटेलमध्ये होते, असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. असे असले तरी पोलिस ठाण्यात येऊन धिंगाणा घालणारी महिला व तो स्वीय सहायक कोण, याचे अनेकांना जाणून घेण्याचे कुतूहल असून, त्यावरून शहरभर मात्र चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Labour Law: 1 तास काम, 2 तासांचा पगार! काय आहे ओव्हरटाइमवर नवीन कामगार कायद्यातील नियम

Canva AI 2.0 लॉन्च! डिझाइनिंग वर्ल्डमध्ये धमाका; 20 पेक्षा जास्त जबरदस्त टूल्स, कसे वापरायचे? पाहा

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, तापमानाचा पारा ४४ अंशावर तरी शाळा सुरूच

IND vs SA: स्मृती मानधानाने रोहित शर्मा-विराट कोहलीला मागे टाकत घडवला नवा इतिहास; T20I मध्ये ठरली अव्वल भारतीय फलंदाज

Kolhapur Gokul Dudh Sangh Clash : दिव्यांग लिपिकाला सभासदांची धक्काबुक्की; 'गोकुळ' सुनावणीला गालबोट; अधिकारी गैरहजर असल्यामुळे तणाव

SCROLL FOR NEXT