Nursing  esakal
नाशिक

Nursing CET Exam : नर्सिंगच्या सीईटी नोंदणीची मुदत 15 पर्यंत वाढविली

Nashik News : पॅरा मेडिकल शाखेतील एमएच-नर्सिंग सीईटी २०२४ च्‍या नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ मिळालेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पॅरा मेडिकल शाखेतील एमएच-नर्सिंग सीईटी २०२४ च्‍या नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ मिळालेली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार पात्रताधारक विद्यार्थ्यांना येत्‍या १५ मार्चपर्यंत संकेतस्‍थळावर सीईटी परीक्षेसाठी अर्ज करता येईल. दरम्‍यान या अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी वयाच्‍या कमाल मर्यादेची अट शिथिल करण्यात आल्‍याने अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मार्ग खुला झालेला आहे. (nashik deadline for CET registration for Nursing been extended to 15 marathi news)

सीईटी सेलतर्फे या परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. यापूर्वीपर्यंत नीट परीक्षेच्‍या कामगिरीच्‍या आधारे बी.एस्सी (नर्सिंग) या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जात होता. परंतु शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून सीईटी सेलतर्फे या अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचे आयोजन केले जाते आहे.

काही दिवसांपूर्वीच शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्‍या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली होती. यादरम्‍यान प्रवेशासाठी कमाल वयोमर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे. त्‍यामुळे पात्र ठरलेल्‍या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने सीईटी सेलतर्फे ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित मुदतीनुसार विद्यार्थ्यांनी १५ मार्चपर्यंत परीक्षा अर्ज व शुल्‍क ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे. (Latest Marathi News)

वयाची सुधारित अट अशी-

यापूर्वी २१ ऑगस्‍ट २०२३ ला जारी केलेल्‍या माहितीपत्रकानुसार अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी विद्यार्थ्याची वयाची कमाल मर्यादा ३५ वर्षे होती. दिव्‍यांग उमेदवारांना वयाच्‍या ४० वर्षापर्यंत प्रवेशाची संधी होती. परंतु भारतीय उपचर्या परिषदेतर्फे २१ ऑगस्‍ट २०२३ ला पत्र जारी करताना प्रवेशासाठी वयाची कुठलीही कमाल वयोमर्यादा नसल्‍याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्‍यामुळे आता कुठल्‍याही वयोगटातील शैक्षणिक अर्हता पूर्ण करणारे विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Goa flight: सोलापूर-गोवा विमानसेवा हाऊसफुल; वर्षभरात १४ हजार प्रवासी, तिकीटदर १२ हजारांवर

Latest Marathi News Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकासाचा मुद्दा पटल्यास भाजपात प्रवेश करेन- संजय राऊत

अल्फाच्या सेटवर आलियाच बॉबी देओलसोबत खरंच भांडण झालेलं? अभिनेता खुलासा करत म्हणाला....'त्यावेळी अनेक गोष्टींकडे मी...'

US Iran war : युद्ध पुन्हा भडकले ! शस्त्रसंधी सुरु असतानाच अमेरिकेचा हल्ला, इराणचाही प्रतिहल्ला; कुवेत ठरलं रणांगण

French Open 2026: चार वेळच्या चॅम्पियनला वाढदिवशीच धक्का! इगा स्विअतेकचा फ्रेंच ओपनमधून अनपेक्षित पॅकअप

SCROLL FOR NEXT