dengue esakal
नाशिक

Nashik Dengue Update: 8 दिवसांत डेंगीचे सव्वाशे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : डेंगीचा उद्रेक अद्यापही शहर व परिसरात कायम असून, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तब्बल १२० डेंगीचे रुग्ण आढळून आले.

महिनाभरात तब्बल २३२ रुग्ण आढळले. जानेवारीपासून आतापर्यंत एकूण ९८७ डेंगीचे रुग्ण आढळले. कामटवाडे परिसरात एका डेंगीबाधिताचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. (Nashik Dengue Update Seven hundred dengue cases in 8 day)

डेंगी रुग्णांची संख्या लक्षात घेता औषध व धूर फवारणीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पावसाळा संपून दोन महिने उलटले तरी अद्यापही डेंगीचा प्रादुर्भाव कायम असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

शहरात जानेवारी ते जुलैअखेरपर्यंत १४४ डेंगी रुग्ण होते. ऑगस्टपासून डेंगीचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरवात झाली. या महिन्यात डेंगीचे ११७ रुग्ण आढळले. सप्टेंबर महिन्यात २६१ डेंगीचे रुग्ण आढळले.

ऑक्टोबर महिन्यात एक हजार ३०० संशयित आढळले. त्यात १५० बाधित झाले. नोव्हेंबर महिन्यात एकूण २३२ रुग्ण आढळले. यातील शेवटच्या आठवड्यात १२० रुग्ण आढळल्याने डेंगीच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट झाले.

नाशिक रोडपाठोपाठ कामटवाडे येथील एकाचा डेंगीने मृत्यू झाला. दरम्यान, डासअळी निर्मूलनासाठी पुरविल्या जाणाऱ्या औषध व धुरासाठी वापरले जाणारे लिक्विड कमी प्रमाणात वापरले जात असल्याच्या संशयावरून तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती प्रभारी मलेरिया अधिकारी डॉ. नितीन रावते यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT