Kapaleshwar Temple  esakal
नाशिक

Maha Shivratri 2024: कपालेश्वर मंदिरात 51 हजार रुद्राक्षांचे वाटप! महाशिवरात्रीनिमित्ताने विश्वस्त समितीचा उपक्रम

Nashik News : मंदिर विश्वस्त समितीने महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर नेपाळमधून हे रुद्राक्ष मागविले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : देशातील एकमेव नंदी नसलेले शिवमंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात यंदा महाशिवरात्रीनिमित्ताने भाविकांना प्रसाद म्हणून ५१ हजार रुद्राक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. मंदिर विश्वस्त समितीने महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर नेपाळमधून हे रुद्राक्ष मागविले आहेत. (nashik Distribution of Rudraksha in Kapaleshwar Temple on Maha Shivratri marathi news)

महाशिवरात्रीनिमित्त कपालेश्वर मंदिरात दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीला पहाटे ४ वाजता दुग्धाभिषेक, दुपारी ३.३० वाजता पालखी, पहाटे ४ वाजेपासून भाविकांना दर्शन घेता येईल. पहाटे ४ ते दुपारी १२ वाजेपर्यंत दुग्धाभिषेक करण्यात येईल.

सकाळी 8 वाजता संस्थान विश्वस्तांच्या वतीने रुद्राभिषेक करण्यात येणार आहे. रात्री १० वाजता पालखी मिरवणूक मंदिरात परत आल्यावर महाआरती होईल. रात्री ११.३० ते पहाटे ४ वाजेपर्यंत महाअभिषेक व महापूजा, आरती करण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई, फुलांची सजावट केली जाणार आहे. भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीने केले आहे. (Latest Marathi News)

पहिल्या पायरीवर लाइव्ह दर्शनाची सोय

मंदिरात होणारी गर्दी तसेच ज्येष्ठ, दिव्यांग भाविकांना पायऱ्या चढण्यासाठी होणारी अडचण लक्षात घेता श्री कपालेश्वर महादेव मंदिर संस्थानच्या वतीने मंदिराच्या पहिल्या पायरीवर टीव्ही स्क्रीनद्वारे भाविकांना लाइव्ह दर्शनाची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाशिवरात्रीला या उपक्रमाचे लोकार्पण करण्यात येईल.

"महाशिवरात्रीला मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले असेल. दर्शन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही असे नियोजन केले आहे. भाविकांच्या काही सूचना असेल तर त्यांनी संस्थान कार्यालयाला संपर्क करावा."

- ॲड प्रशांत जाधव, अध्यक्ष, संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT