water scheme esakal
नाशिक

Nashik : शिंदे गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार...

शिंदे गावात अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : देवळाली मतदारसंघात आमदार सरोज अहिरे यांच्या माध्यमातून गेल्या पंधरवड्यापर्यंत पावणे चारशे कोटी रुपयांची विकासकामे मंजूर झाली होती. आता नव्याने २६ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आल्याने पावणेतीन वर्षात तब्बल चारशे कोटींच्या विकासकामांना गवसणी घातली आहे. शहरालगत असलेल्या शिंदे गावात अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. आमदार सरोज अहिरे यांच्या प्रयत्नातून जलजीवन मिशनअंतर्गत १८ कोटींची योजना मंजूर करण्यात आली.

पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याचे वृत्त समजताच ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर फटाके वाजवून व पेढे वाटून जल्लोष केला. योजनेसाठी माजी सरपंच रतन जाधव यांनी पाठपुरावा केला होता. या वेळी सरपंच गोरख जाधव, उपसरपंच अनिता तुंगार, कैलास भांगरे, मोतीराम जाधव, रामदास तुंगार, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव जाधव, बालम बोराडे, ज्ञानेश्वर जाधव, गणपत जाधव, वंदना जाधव, शालिनी तुंगार, अर्चना जाधव, सुप्रिया तुंगार, हिराबाई जाधव, अश्विनी साळवे, ग्रामविकास अधिकारी सुरेश भोजने, सुदाम जाधव, विष्णू बोराडे, गणेश जाधव, विश्वनाथ जाधव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar: आधी पावसानं झोडपलं, आता भूकंपानं हादरलं पालघर; कासा, धुंदलवाडी परिसरात 3.1 रिश्टर स्केलचे धक्के

IND vs ZIM 2nd T20 LIVE: फ्रीमध्ये सामना कुठे पाहणार? वेळ, TV चॅनेल आणि LIVE Streamingची संपूर्ण माहिती

Live Updates Marathi : दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ कल्याण येथील फडके मैदानात विद्यार्थी आणि तरुणांचे आंदोलन

CJP Protest : आंदोलकांचा चेहरा स्कॅन करणाऱ्या AI चा दिल्ली पोलिसांकडून वापर; गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह, कसं कामं करत हे तंत्रज्ञान?

karj mafi 2026 : कर्जमाफीची घोषणा झाली... पण लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी? अंमलबजावणीवर मोठे प्रश्न उपस्थित

SCROLL FOR NEXT