eggs sakal
नाशिक

Nashik Egg Price Hike: थंडी पडताच अंड्यांच्या दरात वाढ

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : ‘संडे हो या मंडे रोज खाओ अंडे’, असे म्हटले जाते. यामुळे नाश्त्यामध्ये अनेक जण अंड्यांचा वापर करतात. हिवाळ्यात तर अंड्याला चांगलीच मागणी असते. थंडी वाढू लागल्याने अंड्याचे भाव आता वाढू लागले आहेत.

आवक कमी आणि मागणी वाढल्याने काही दिवसांपूवीं ६० रुपये डझन मिळणाऱ्या अंड्यांचे दर आता ८० ते ८५ रुपयांवर गेले आहेत. (Nashik Egg Price Hike Increase in price of eggs cold weather increase winter update)

थंडीत वाढ झाल्यानंतर दरात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. अंड्याचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे.

पिंपळगाव शहरात अंड्याचे भाव डझनाला ८० ते ८५ रुपयांपर्यंत पोचले आहेत, तर गावरानी अंड्यांचा दर १३० ते १४० रुपये आहे. मागील वर्षी कोंबड्यांचे उत्पादन वाढले होते.

परिणामी, अंड्याचेही उत्पादन वाढल्याने भाव घटले होते. याचा फटका लहान शेतकरी आणि पोल्ट्री उत्पादकांना बसला. त्यांनी यंदा या व्यवसायात कमी गुंतवणूक केली.

त्यामुळेच उत्पादन घटले आहे. कोंबडीच्या खाद्याच्या दरातही विक्रमी वाढ झाली आहे, त्याची झळ ग्राहकांच्या खिशाला बसू लागली आहे.

यंदा अंड्याचे उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत घटले आहे. अनेक पोल्ट्रीधारक आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांनी नव्याने पक्षी आणले नाहीत.

"कोंबडीचे खाद्य महागले असून, उत्पादनही कमी झाले आहे. परिणामी, अंड्याच्या दरात वाढ झाली आहे. सध्या किरकोळ बाजारात अंडी प्रतिडझन ८० ते ८५ रुपये झाले आहेत. एका अंड्यासाठी ७ रुपये मोजावे लागत आहे. आता थंडी वाढल्यानंतर अजून भाववाढीची शक्यता आहे. कारण मागील वर्षी अधिक उत्पादन झाल्याने अंड्याचे दर कमी होते."

- जावेेद पठाण, अंडी विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT