नाशिक

सिन्नर येथील उपजीविका संसाधन केंद्रामधून रोजगार

CD
पान-२ मेन करणे --------------- महिला, युवकांना रोजगाराची सुवर्णसंधी सिन्नरच्या उपजीविका केंद्रातून मार्गदर्शन ः मुख्यमंत्री फडणविसांच्या नेतृत्वाखालील शासनाचा उपक्रम सकाळ वृत्तसेवा सिन्नर- नाशिक, ता.१३ ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाच्या रोजगाराभिमुख दृष्टिकोनाला पूरक ठरणारा उपक्रम नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ‘मॅजिक बस इंडिया फाउंडेशन’च्या माध्यमातून सिन्नर येथे कार्यरत असलेले उपजीविका संसाधन केंद्र ग्रामीण युवक व महिलांना कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार आणि व्यवसायाच्या संधींशी जोडण्याचे काम करीत आहे. या केंद्राच्या उपक्रमाला सर दोराबजी टाटा ट्रस्ट यांचे सहकार्य लाभले आहे. -------------- सिन्नर येथील उपजीविका संसाधन केंद्राच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण युवक आणि महिलांना कौशल्याधारित संधी उपलब्ध करून देणे, महिला उद्योजकतेला चालना देणे आणि आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग सुकर करणे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागातील उपलब्ध मनुष्यबळाला योग्य प्रशिक्षण, समुपदेशन आणि बाजारपेठेची जोड दिल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. या दृष्टीने सिन्नर येथील उपजीविका संसाधन केंद्रामार्फत युवक व महिलांना स्वावलंबनाकडे नेणाऱ्या विविध संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सिन्नर तालुक्यात १२ गावांत उपक्रम सिन्नर तालुक्यातील मनेगाव, धोंडवीरनगर, कुंदेवाडी, मुसळगाव, बारागाव पिंपरी, पाट पिंपरी, हरसुळे, सोनांबे, लोणवारवाडी, भाटवाडी, वडगाव सिन्नर आणि खापरळे या १२ गावांमध्ये सामुदायिक संघटन आणि जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात आले आहेत. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, समुदाय संसाधन व्यक्ती, अंगणवाडी सेविका, कृषी सखी, शिक्षक आणि स्वयं-सहायता गटांच्या सहकार्याने स्थानिक नागरिकांपर्यंत उपजीविकेच्या संधींची माहिती पोहोचविण्यात आली. यापैकी सात गावांमध्ये जनजागृती बैठका घेण्यात आल्या. -------------- ग्रामीण भागातील गरजा लक्षात घेऊन स्थानिक संस्थांचा सहभाग वाढविणे, युवक व महिलांना उपलब्ध संधींची माहिती देणे आणि त्यांना योग्य प्रशिक्षणापर्यंत पोहोचविणे, या बाबींना या उपक्रमात महत्त्व देण्यात येत आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने आयोजित उद्योजकता जागरूकता कार्यक्रमात ४८ महिलांनी सहभाग घेतला. त्यानंतर निवडलेल्या ३६ महिलांसाठी नुकतेच उद्योजकता विकास प्रशिक्षण झाले. यात व्यवसायाची निवड, व्यवसाय आराखडा, उत्पादन खर्च व किंमत निर्धारण, विपणन, आर्थिक साक्षरता, कॅशबुक व्यवस्थापन, बाजारपेठेचे सर्वेक्षण, सरकारी योजनांची माहिती आणि ग्राहक व पुरवठादारांशी संबंधित बाबींचा समावेश होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या विकासविषयक प्राधान्यांमध्ये युवकांसाठी संधी निर्माण करणे आणि महिलांच्या आर्थिक सहभागाला प्रोत्साहन देणे या बाबींना महत्त्व आहे. सिन्नरमधील उपजीविका संसाधन केंद्राचा उपक्रम स्थानिक गरजांनुसार कौशल्य प्रशिक्षण, रोजगार मार्गदर्शन आणि उद्योजकतेच्या संधी एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहे. ---------------- २०-२ चौकट सर्व बारा गावात युवक संघटन युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सिन्नर उपजीविका संसाधन केंद्राने सर्व १२ लक्षीत गावांमध्ये युवक संघटन मोहीम राबविली आहे. या अंतर्गत दोन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चार प्रशिक्षण संस्था आणि दोन पदवी व पदव्युत्तर महाविद्यालयांना भेटी देण्यात आल्या आहेत. रोजगारदात्यांशी संपर्क, उद्योग क्षेत्राची माहिती आणि नोकरीसाठी आवश्यक मार्गदर्शन मिळावे यासाठी विविध कार्यालये आणि ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थांशी समन्वय साधण्यात आला आहे. ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

IPL 2027 मध्ये रोहित शर्मा पुन्हा मुंबईचा कर्णधार? हार्दिक पंड्याचं काय होणार?

China Woman Story: एअर होस्टेसची नोकरी सोडली! आता खेकडे विकून 'ती' करते दिवसाला १४ लाखांची कमाई

BJP Victory: अमित शाह बोलले! राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, 2029च्या निवडणुकांमध्ये...

IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय; युवराज सिंगकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT