Dignitaries along with former mayor Ashok Murtadak while distributing helmets  esakal
नाशिक

Nashik News : हेल्मेट, सीटबेल्टचा नियमित वापर करा : अशोक मुर्तडक

Nashik News : दुचाकी चालवताना हेल्मेट आणि कार चालविताना सीटबेल्टचा नियमित वापर केला पाहिजे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दुचाकी चालवताना हेल्मेट आणि कार चालविताना सीटबेल्टचा नियमित वापर केला पाहिजे. कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचे पालन करावे. प्रवासाला जाण्यापूर्वी वाहनाच्या चाकातील हवा, ब्रेक ऑईलसह इतर तपासणी करून घ्यावी, असे आवाहन माजी महापौर तथा औद्योगिक महाराष्ट्र कामगार सेनेचे अध्यक्ष अशोक मुर्तडक यांनी केले. (Nashik ex mayor Ashok Murtadak marathi news)

रस्ता सुरक्षा व कामगारांच्या परिवाराची सुरक्षा या दृष्टिकोनातून माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (ता.२७) दुपारी ३.३० वाजता मोटार वाहन विभाग, औद्योगिक महाराष्ट्र कामगार सेना, बजाज सन्स लि. सातपूर आणि ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मोटार व्हेईकल डिपार्टमेंट टेक्निकल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स असोसिएशन यांच्याकडून बजाज सन्स कंपनीत मोफत हेल्मेट वाटप झाले.

त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कंपनीतील सर्व स्टाफ व ३२५ कामगारांना मोफत हेल्मेट वाटले. कामगारांनी हेल्मेट परिधान करून कंपनी परिसरात फेरी काढली. यावेळी कंपनीचे एमडी सुमीत बजाज, एचआर जीएम ललित देवनहल्ली, नाशिकचे तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत, मोटार वाहन निरीक्षक सचिन बोधले, नरेंद्र जाधव, सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रवीण सोनवणे, नमिता सानप, औद्योगिक कामगार सेनेचे सेक्रेटरी संजय बुटे, नितीन कातकाडे, प्रदीप बगाटे, राकेश बोरसे, योगेश चंद्राजे, वाल्मीक आहिरे आदी उपस्थित होते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

MLA Gopichand Padalkar: 'जयंत पाटील यांच्याविषयी एकही शब्द बोलणार नाही': आमदार गोपीचंद पडळकर; घायवळचे अनेक साथीदार रोहित पवारांचे मित्र

Solapur News:'जमीन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाची गरज‌'; जिल्हाधिकाऱ्यांकडून माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी

Sinai River: 'कोळेगाव-आष्टे बंधाऱ्याची झाली दुर्दशा'; सीना नदीचा पूर ओसरल्यानंतरही पुलावरील वाहतूक अद्याप बंद

SCROLL FOR NEXT