Police Commissioner Sandeep Karnik, Deputy Commissioner Prashant Bachhao, Assistant Commissioner Sandeep Mitke etc. along with retired police officers-executives of City Police Commissionerate. esakal
नाशिक

Nashik Police Retirement : सेवानिवृत्तांना सन्मानित करीत दिला निरोप! आयुक्तालयातील 26 अधिकारी-अंमलदारांचा सत्कार

Nashik News : पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते शनिवारी (ता. २९) सन्मानित करीत समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. यावेळी अनेकांना गहिवरून आले होते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Retirement : शहर आयुक्तालयातील २६ पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे ३० जून अखेर सेवानिवृत्त होत असून, त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते शनिवारी (ता. २९) सन्मानित करीत समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. यावेळी अनेकांना गहिवरून आले होते. (Nashik Farewell to retirees by honoring Commissionerate felicitated)

३० जून अखेर शहर पोलीस आयुक्तालयातील एक पोलीस निरीक्षक, ४ उपनिरीक्षक, ९ श्रेणी उपनिरीक्षक, ७ सहायक उपनिरीक्षक, ४ हवालदार आणि एक लिपिक असे २६ अधिकारी-अंमलदार सेवानिवृत्त होत आहे. या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयात आयुक्त संदीप कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी शहर गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी-अंमलदार कुटूंबियांसह उपस्थित होते. आयुक्त संदीप कर्णिक यांनी या अधिकारी-अंमलदारांना शुभेच्छा देताना येत्या काळात स्वत:च्या आरोग्याची निगा राखण्याच्या शुभेच्छा दिल्या. उपनिरीक्षक सूत्रसंचालन धनराज पाटील यांनी केले. तर, सहायक आयुक्त मिटके यांनी आभार मानले. (latest marathi news)

हे झाले सेवानिवृत्त

पोलीस निरीक्षक भरतसिंग पराडके, उपनिरीक्षक अशोक उघडे, सुभाष जाधव, सुनील गीत, शिवाजी गागरे, महेश जाधव, अनिल सोनवणे, मारुती कुंदे, सुरेश निकम, मोतीराम चव्हाण, यशवंत शिंदे, गोरक्षनाथ शेलार, प्रवीण कोकाटे, विजय मिसाळ, राजेंद्र कदम, सहायक उपनिरीक्षक सुनील साळवे, शिवाजी गुंजाळ, मारुती भड, हवालदार दत्तू नागरे, अशोक परदेशी, बाळासाहेब बहिरम, कैलास शिंदे, लिपीक अनुराधा पवार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

Gorakhpur Mumbai Train Bomb Threat : गोरखपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये बॉम्बची धमकी; प्रवशांमध्ये खळबळ अन् शोधमोहीम सुरू

Latest Marathi Breaking News: कामातील निष्काळजीपणा भोवला, दोन अभियंते निलंबित

SCROLL FOR NEXT