नाशिक

ध्वजारोहण सोहळ्याचे काटेकोर नियोजन करावे : सिंह

CD
ध्वजारोहण सोहळ्याचे काटेकोर नियोजन करा आयुक्त शेखर सिंह : व्यवस्थापन समितीचा आढावा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : नाशिकच्या रामतीर्थ आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तावर होणारा ध्वजारोहण सोहळा सुरळीत, सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात पार पडण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे. संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून आवश्यक व्यवस्था वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिले. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयात शनिवारी (ता. २४) ध्वजारोहण सोहळा व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. त्याप्रसंगी सिंह बोलत होते. या वेळी महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब शिंदे, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आयुक्त सिंह म्हणाले, की ध्वजारोहण सोहळा नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण कराव्यात. प्रवेश, वाहतूक, गर्दी नियंत्रण व नागरिकांना मार्गदर्शन या बाबींमध्ये समन्वय राखून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशाही सूचना त्यांनी केल्या. आसनव्यवस्थेचे नियोजन रामतीर्थ व त्र्यंबकेश्वर येथील ध्वजारोहण सोहळ्यांसाठी विभागनिहाय आसनव्यवस्था निश्चित करून प्रवेश नियंत्रणाची प्रभावी यंत्रणा उभारण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. दोन्ही ठिकाणी गर्दीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी प्रवेशद्वारे, निर्गमन मार्ग, बॅरिकेडिंग व मान्यवरांच्या हालचालींचे नियोजन करण्यावर भर देण्यात आला. मुख्य मंचासमोरील जागा मोकळी ठेवण्यासह उपलब्ध जागेनुसार विविध श्रेणींतील निमंत्रितांची बैठकव्यवस्था निश्चित करावी, अशा सूचना आयुक्त सिंह यांनी दिल्या. वाहतुकीसाठी स्वतंत्र आराखडा ध्वजारोहण सोहळ्याच्या ठिकाणी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नियोजन करावे. प्रमुख शासकीय कार्यालयांमधून सामुदायिक बससेवेचा पर्याय विचारात घेत जिल्हा परिषद, महापालिका आणि अन्य कार्यालयांशी समन्वय साधावा. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीचे नियोजन करताना वाहनतळ, बसमधून उतरण्याची ठिकाणे, प्रवेशद्वारे आणि कार्यक्रमस्थळापर्यंतचा मार्ग दर्शविणारा नकाशा तयार करावा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. गोदाआरतीसाठी गर्दी व्यवस्थापन रामतीर्थ येथे होणाऱ्या गोदाआरतीच्या वेळी भाविक व पर्यटकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन स्वतंत्र व्यवस्थापन आराखडा तयार करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. आरतीस्थळी येण्या-जाण्याचे मार्ग, बॅरिकेडिंग, गर्दी नियंत्रण आणि आपत्कालीन मार्ग खुले ठेवण्यास प्राधान्य द्यावे. भाविकांची सुरक्षितता अबाधित राखून त्यांना आरतीचे दर्शन सुलभ व्हावे, यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले.

Career Growth: ज्याला तीन लाख वार्षिक पगाराच्या कामावरून कंपनीने काढलं, त्याच तरुणाला आली दुबईतील १.५ कोटींच्या नोकरीची ऑफर

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

पुढच्या सात दिवसांत ४ राशींचं नशीब चमकणार! धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे योग

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

CBI Arrests ED officers : दुसऱ्यांवर धाडी टाकणाऱ्या ED अधिकाऱ्यांवरच CBI ची झडप! केसमधून वाचवण्यासाठी केला होता 'हा' मोठा सौदा

SCROLL FOR NEXT