railway job fraud esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून 6 कोटींचा गंडा! आंतरराज्य टोळी कार्यरत; तब्बल 62 जणांना फसविले

Crime News : याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदरचा गुन्हा तपासाकामी आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून संशयिताच्या टोळीने एकाला तब्बल ११ लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याचप्रमाणे, या टोळीने तब्बल ६२ जणांना आमिष दाखवून त्यांची सुमारे ६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदरचा गुन्हा तपासाकामी आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. (Nashik Fraud Crime 6 Crore scam by luring job in Railways)

रमण सिंग उर्फ विशाल सिंग (रा. कोलकत्ता), निरज सिंग (रा. टाटानगर, झारखंड), ऋतुराज पाटील उर्फ हेमंत हनुमंत पाटील (रा. सांगली), राजेश सिंग (रा. कोलकत्ता), अंशुमन प्रसाद (रा रांची, झारखंड), संदीप सिंग (रा रांची), जैन अली (रा. वाशी, नवी मुंबई) असे संशयितांची नावे आहेत.

विरेश राजेश वाबळे (रा. नर्मदा हौसिंग सोसायटी, लोखंडेमळा, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, वाबळे यांचे शैलेंद्र महिरे यांच्याशी घरोब्याचे संबंध होते. संशयित रमन सिंग याने त्यांच्या मुलास रेल्वेमध्ये नोकरीला लावून दिले होते. त्यामुळे संशयित रमणसिंग याने वाबळे यांच्या पत्नीलाही रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले.

वाबळे यांचाही त्याच्यावर विश्वास बसला. त्यासाठी संशयित रमणसिंग याने त्यांच्याकडून ८ लाख रुपये घेतले. त्यानंतर संशयितांनी श्रीमती वाबळे यांना प्रशिक्षणासाठी कोलकत्ता येथे बोलावून घेतले. खोटे नियुक्तीपत्रासह कोलकत्त्यात एका ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून नेमले.

त्यानंतर महाराष्ट्रात बदली करण्यासाठी पुन्हा वाबळे यांच्याकडून पैसे घेतले. मात्र नंतर फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. तोपर्यंत त्यांची तब्बल ११ लाखांची फसवणूक झाली होती. अशाचरितीने संशयितांच्या टोळीने ६२ जणांची फसवणूक केली असून, सुमारे ६ कोटी २ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (latest marathi news)

तपास आर्थिक गुन्हेशाखेकडे

सदरचा प्रकार डिसेंबर २०२२ ते जून २०२४ या दरम्यान घडला आहे. संशयितांनी फिर्यादी वाबळे यांना विश्वासास घेऊन त्यांच्या पत्नीच्या नावे रेल्वेचे बनावट लेटरहेड, कागदपत्रे, शिक्के मारून सुरवातीला प्रशिक्षणार्थी म्हणून कोलकत्ता येथे नेमणूक केली.

त्यानंतर महाराष्ट्रात बदली करण्यासाठी पुन्हा पैसे उकळले. अशाप्रकारे फसवणूक करणारी ही मोठी साखळी असून, ६ कोटींची फसवणूक उघडकीस आली आहे. सदरचा गुन्हा तपासाठी आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला असून, तपास सहायक निरीक्षक किशोर कोल्हे हे करीत आहेत.

"पैसे घेऊन कोणी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवित असेल तर त्यात फसवणूक होण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे अशाप्रकारे कोणी आमिष दाखवित असेल तर त्याची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी."- प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, शहर गुन्हेशाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT