Fraud Crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धेला गंडा; पंचवटीच्या हिरावाडीतील घटना

Fraud Crime : ७५ हजारांचे सोने हातचलाखीने लंपास करीत त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : हिरावाडीत पायी जाणाऱ्या महिलेस दोघा संशयितांनी पोलिस असल्याची बतावणी करून त्यांचे ७५ हजारांचे सोने हातचलाखीने लंपास करीत त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७८ वर्षीय वृद्धा हिराबाई कृष्णा जाधव (रा. स्नेहधारा अपार्टमेंट, हिरावाडी रोड) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता. २) सकाळी सात वाजेच्या सुमारास त्या ओमनगरमधील महावीर बंगल्यासमोरून पायी जात होत्या. ( Fraud of old woman by pretending to be policeman )

त्यावेळी पाठीमागून आलेल्या दोघा संशयितांनी त्यांनी आवाज देऊन थांबविले. त्यावेळी संशयिताने आम्ही पोलिस आहोत. अंगावर एवढे सोने घालून का फिरता असे म्हणून ते त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या पिशवीत ठेवण्याच्या बहाण्याने स्वत:कडे घेत, त्या बांगड्या पिशवीमधये ठेवत असल्याचे भासवून हातचलाखीने ७५ हजारांच्या दोन बांगड्या भामट्यांनी हातोहात लंपास करीत त्यांना फसविले.

घरी आल्यानंतर त्यांनी पाहिले असता पिशवीत बांगड्या नसल्याचे पाहून फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पंचवटी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक कैलास जाधव हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

Bihar Laborer Killed in Sangli : मित्रानेच काढला काटा! जुन्या धामणीत नदीकाठी बिहारी मजुराचा धारदार शस्त्राने चिरला गळा; सांगलीत 72 तासांत पाचवा खून

Pune News: हिंजवडीत दूषित पाणी पिण्याची नामुष्की; सोसायट्यांमधील स्थिती, शुद्धीकरणानंतरही दुर्गंधी, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

SCROLL FOR NEXT