ताम्रपट Sakal
नाशिक

नाशिक : ‘हतगड’च्या किल्लेदारांच्या वंशजाकडे २१ ताम्रपट

तांबा धातूमधील ताम्रपटावर मोडी आणि उर्दू लिपीत लेखन केलेले आहे.

आनंद बोरा,सकाळ वृत्तसेवा

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाशिकचे दख्खन लढवय्ये किल्लेदार गोगाजीराव मोरे-देशमुख यांनी इसवी सन १६६३ मध्ये हतगड किल्ला जिंकला. गोगाजीराव मोरे यांचे तेरावे वंशज मनोहर मोरे-देशमुख यांनी २१ शिवकालीन ताम्रपट जपून ठेवले आहेत. त्यात शिलालेख, वंशावळी, मोजमाप आदींची माहिती आहे. ताम्रपटात शिवकालीन, गड-समाधी-शिलालेख-राजमार्गावरील दोन्ही बाजू दर्शवणारा असे नकाशा, उर्दू शिलालेख, महादेव मंदिर शिलालेखाचा त्यात समावेश आहे.

तांबा धातूमधील ताम्रपटावर मोडी आणि उर्दू लिपीत लेखन केलेले आहे. सह्याद्रीच्या पूर्व भागातील एका रांगेची सुरवात सुरगाणा तालुक्यातून होते. यालाच सातमाळ रांग असे म्हणतात. या रांगेच्या उपशाखेवर हतगड किल्ला आहे. किल्लेदार गोगाजीराव मोरे-देशमुख यांना पराक्रमाच्या बदल्यात महाराजांनी त्यांना १२ गावांची देशमुखी दिली. यासंबंधीचे ताम्रपट छत्रपती शिवाजी महाराजांनी सुपूर्द केले होते. हतगडावरील शके १४६९ मध्ये कोरलेला शिलालेख बागलाणमधील बागूल राजाच्या ताब्यात असल्याची साक्ष देतो.

हतगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. किल्ल्याविषयी विनामूल्य माहिती देत असतो. पूर्ण गड पर्यटकांना समजून सांगतो. किल्ल्याचा इतिहास मला पुढील पिढीपर्यंत पोचवायचा आहे. त्यासाठी मदत अपेक्षित आहे.

- मनोहर मोरे-देशमुख (किल्लेदार गोगाजीराव मोरे-देशमुखांचे वंशज)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT