Lok Sabha Constituency esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : नाशिकमधील तिढा कायम, नेत्यांचे मौन; संभ्रमात वाढ

Lok Sabha Constituency : नाशिकची जागा कुठल्या पक्षाला व उमेदवार कोण याबाबतही वरिष्ठ नेत्यांनी मौन राखल्याने दिवसेंदिवस संभ्रम अधिकच वाढत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Constituency : महायुतीमध्ये लोकसभेच्या नाशिक मतदारसंघाचा तिढा अद्यापही कायम आहे. नाशिकची जागा कुठल्या पक्षाला व उमेदवार कोण याबाबतही वरिष्ठ नेत्यांनी मौन राखल्याने दिवसेंदिवस संभ्रम अधिकच वाढत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात अद्याप कुठल्या पक्षाला जागा जाईल हे अद्याप निश्चित नाही. भारतीय जनता पक्षाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये भाजपचा भारतीय जनता पक्षाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये भाजपला जागा सुटल्यास निवडून येणे सोपे जाईल असा तर्क लावत नाशिकच्या जागेवर दावा करण्यात आला होता. ()

त्यानंतर दहा वर्षांपासून शिवसेनेचा खासदार असल्याने शिवसेनेच्या शिंदे गटाने या जागेवर दावा केला. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी १२ मार्च रोजी नाशिकमध्ये झालेल्या संवाद मेळाव्यात विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना ‘तयारीला लागा, विजय आपलाच आहे’ असा संदेश दिल्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी थेट वरिष्ठांकडे तक्रार केली. शिवसेनेच्या दाव्यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यात पाच आमदार असल्याने नाशिकच्या जागेवर दावा केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे व गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर मनसेलादेखील नाशिकची जागा मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली. त्या अनुषंगाने स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे नाशिकच्या जागेची मागणी केली. नाशिकच्या जागेवर महायुतीतील चार पक्षांनी दावा केल्याने तिढा अधिक वाढला. भाजपच्या नेत्यांनी नाशिकच्या जागेवरचा दावा सोडला नसला तरी मौन राखले आहे.(latest marathi news)

तर गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे काय भूमिका घेतात यावर मनसेची पुढील दिशा अवलंबून आहे. सध्या महायुतीमधील शिवसेनेचा शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट या दोघांमध्ये जागेवरून चुरस आहे. यातही उमेदवारीवरून दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत स्पर्धा निर्माण झाली आहे.

लवकर घोषणेची शक्यता मावळली

नाशिकच्या जागेचा तिढा अद्यापही सुटत नाही. छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आल्यानंतर राष्ट्रवादीकडून देखील अधिकृतपणे त्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. शिवसेनेच्या शिंदे गटात नाशिकच्या जागेसाठी नवीन चेहऱ्याचा शोध सुरू आहे. मागील तीन दिवसांपासून उमेदवारी घोषित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला उमेदवाराची घोषणा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र महायुतीमधील शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी देखील नाशिकच्या जागेबद्दल मौन राखल्याने या जागेचा तिढा अद्यापही कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT