Farmers flocked to the shop to buy seeds. esakal
नाशिक

Kharif Season : घोटीत भात बियाणे खरेदीची लगबग; शेतकऱ्यांकडून खरीपाची जोरदार तयारी

Nashik News : खरीप हंगाम सुरु झाल्याने पेरणीकरीता शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रांवर लगबग सुरु झाल्याचे चित्र आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : खरीप हंगाम सुरु झाल्याने पेरणीकरीता शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रांवर लगबग सुरु झाल्याचे चित्र आहे. इगतपुरी तालुक्यातील अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या घोटी बाजारपेठेत सध्या कृषि विक्रेत्यांनी विविध नामांकित कंपन्यांची बियाणे विक्रीसाठी ठेवली आहेत. यंदा हवामान खात्याने वेळेत पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (Kharif Season comes farmer Rush to buy paddy seeds in Ghoti)

दुसरीकडे इलेक्ट्रिक मोटारीच्या सहाय्याने शेतकरी भात पिकांना पाणी देत आहे. शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या सुरवातीलाच बियाणे पेरणीला सुरवात केल्याचे दिसत आहे. कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाबरोबरच तंत्रज्ञानाचा वापर होताना दिसत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे हवामानाचा अंदाज येत असल्याने पिकांचे नुकसान देखील कमी होत आहे.

शेतकरी बियाणांची खरेदी महाडीबीटीवर ऑनलाईन पद्धतीने करू शकतो. शेतकऱ्यांनी बियाणांची खरेदी करताना पक्की पावती घ्यावी. बियाणांचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व पाकीटातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे, असे आवाहन कृषि अधिकाऱ्यांनी केले आहे. (latest marathi news)

भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणांचे पाकीट सिलबंद व मोहोरबंद असल्याची खात्री करावी. त्याचबरोबर पाऊस पडल्यावरच बियाणे टाकावे, असे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी सांगितले.

"आदिवासी शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत बोगस कंपन्याचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना घरोघरी जावून प्रलोभने दाखवून बियाणे खरेदी करण्याची गळ घालतांना दिसतात. बियाणांची खरेदी करताना अधिकृत कृषी केंद्र विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी." - विनायक वाजे, कृषी केंद्र संचालक, घोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT