नाशिक

ध्वजारोहणाला भाविकांची पायपीट

CD
ध्वजारोहणाला भाविकांची पायपीट सुरक्षा व्यवस्थेवर भर; वाहतूक नियोजनात बदल सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ३१ ऑक्टोबरला सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा होत आहे. सोहळ्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह केंद्र व राज्यातील महत्त्वाचे मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले असून यादिवशी रामकुंडाकडे येणाऱ्या मार्गावर बॅरिकेटींग केले जाणार आहे. वाहतूक मार्गातही बदल केले जातील. परिणामी ध्वजारोहणाचे साक्षीदार होण्यासाठी नाशिककरांसह येणाऱ्या भाविकांनी पायपीट करावी लागेल. पंचवटीतील रामकुंडावर दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी ध्वजारोहण सोहळा होणार आहे. तर याठिकाणी सायंकाळी गोदाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुषंगाने शुक्रवारी (ता.१६) जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वआढावा घेण्यात आली. ध्वजारोहणाच्या दिवशी गोदाकाठ परिसरासोबत शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर कडेकोट बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर बॅरिकेडिंग, वाहतूक वळविणे आणि काही ठिकाणी व्यावसायिक व्यवहार बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. रामकुंडाकडे येणाऱ्या नागरिकांसाठी जुने भाजी पटांगण आणि म्हसोबा पटांगण येथे व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र, या भाविकांची वाहनांसाठी विविध ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था केली जाईल. परिणामी नागरिकांना या वाहनतळापासून ते रामकुंडापर्यत पायी अंतर गाठावे लागणार आहे. कोट नागरिकांच्या सोयीसुविधांना प्राधान्य देताना वाहनतळापासून कार्यक्रमस्थळापर्यंत पोहोचण्याचे मार्ग सुकर असावे. नागरिकांना कमीतकमी अंतर पायी चालावे लागेल, अशा पद्धतीने वाहनतळ, वाहतूक व्यवस्था आणि होल्डिंग एरियाचे नियोजन करावे. गर्दी व्यवस्थापन, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा व आपत्कालीन व्यवस्थाही प्रभावी असावी. नागरिक, भाविकांच्या सुरक्षिततेसंदर्भातही दक्षता घ्यावी. - गिरीश महाजन, पालकंमत्री, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Squad: न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा! वनडे मालिकेत २ कर्णधार का? शुभमन गिलनंतर श्रेयस अय्यरकडे धुरा; नेमकं कारण काय?

UP Mega Survey: उत्तर प्रदेशचा पुढचा मुख्यमंत्री म्हणून जनतेची पसंती कुणाला? योगी, अखिलेश की मायावती?

Delhi Protest High Drama : कॅनॉट प्लेसमध्ये 'तिरंगा मार्च'वरून प्रचंड गदारोळ; अभिजीत दिपके, नेहा बोरांसह १५० हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी उचलले!

Swargate to Katraj Metro Work : मेट्रोच्या कामासाठी कात्रज चौकात आजपासून वाहतुकीत बदल; जड वाहनांना प्रवेशबंदी

Starlink India Controversy : "माझा मोदींना विरोध आहे, पण बाहेरचा गोरा माणूस भारताचे निर्णय घेऊ शकत नाही!"; इलॉन मस्कवर असदुद्दीन ओवेसी

SCROLL FOR NEXT