नाशिक

दोनदिवस मद्यविक्री बंदी आदेशात बदल

CD
दोनदिवस मद्यविक्री बंदी आदेशात बदल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुधारित आदेश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ३० व ३१ ऑक्टोबरला नाशिक व त्र्यंबकेश्‍वर येथे मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले होते. मात्र, या आदेशात बदल करण्यात आला असून रामकुंड तीर्थ परिसरातील दोन किलोमीटर तसेच त्र्यंबकेश्‍वर नगरपालिका हद्दीतील सर्व दुकाने बंद ठेवावे, असे आदेश देण्यात आले आहेत. सिंहस्थ कुंभमेळा पर्वास पंचवटीत रामतीर्थ आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ येथे ३१ तारखेला ध्वजारोहणाने प्रारंभ होत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नाशिक महापालिका, नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्ग आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या हद्दीतील सर्व देशी-विदेशी मद्यविक्री दुकाने ३० व ३१ तारखेला दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते. या आदेशानुसार संबंधित क्षेत्रातील देशी दारुची दुकाने, विदेशी मद्यविक्रीची दुकाने तसेच विविध परवान्यांच्या श्रेणीतील मद्यविक्री केंद्रे बंद ठेवावी लागणार होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी गुुरुवारी (ता.२२) सुुधारीत आदेश काढले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या सुधारित आदेशानुसार रामतिर्थापासून दोन किलोमीटर परिघातील तसेच त्र्यंबकेश्‍वर नगरपालिका हद्दीतील मद्यविक्रीची सर्व दुकाने बंद ठेवण्यात येतील. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारकांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यातील कलम ५४ व ५६ नुसार कठोर कारवाईचा इशाराही जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar News : डिंभे धरण ९९.८ टक्के भरले तरी उजवा कालवा कोरडा; आंबेगाव आणि शिरूर तालुक्यांतील पिके पाण्याअभावी करपली

Saudi Execution: मक्केतील फाशीच्या प्रकरणाला नवे वळण; सोशल मीडियावर आरोपांची राळ; भारतीय व्यक्तीचा का होतोय उल्लेख?

Latest Marathi News Live Update : 'हा' तर शिंदेंना गोत्यात आणण्याचा डाव; गुलाबराव पाटीलांनी केली ऑडिओ क्लिपच्या SIT चौकशीची मागणी

ED Raid : अवैध स्त्रीबीज खरेदी-विक्री रॅकेटप्रकरणी बारामती, ठाणे आणि नाशिकमध्ये ईडीचे छापे; २९ लाखांची रोकड जप्त

Ration Card e-KYC: रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आता घरबसल्या करता येणार ई-केवायसी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT