नाशिक

विश्‍वविक्रमी शंखनाद, गोदाआरती

CD
सेकंड मेन फोटो : H32896 -- गोदातीरी रचला जाणार इतिहास २५ ऑक्टोबरला विक्रमी शंखनाद, गोदाआरती सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १८ : नाशिक- त्र्यंबकेश्‍वर सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाच्या पार्श्‍वभूमीवर विश्‍वविक्रमी शंखनाद आणि गोदाआरती करण्यात येणार आहे. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी २५ ऑक्टोबरला सायंकाळी पाचला ५०१ व्यक्ती एकाच वेळी शंखनाद करतील. अनंत विजय शंखनाद या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत ३१ ऑक्टोबरला ६५०० आदिवासी बांधवांच्या हस्ते गोदाआरती करण्यात येणार आहे. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे ही आरती होईल. या दोन्ही कार्यक्रमांची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधे नोंद होणार असल्याची माहिती कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह व महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाशिक- त्र्यंबकेश्‍वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात रविवारी (ता. १८) संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या वेळी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, महंत भक्तीचरणदास, उपाध्यक्ष शांताराम भानोसे, नृसिंह कृपादास, सचिव मुकुंद खोचे, राजेंद्र फड, धनंजय बेळे, प्रफ्फुल संचेती, ‘अनंत विजय शंखनाद’ तर्फे वृषाली घोलप, प्रदीप बच्छाव उपस्थित होते. भारतीय संस्कृतीच्या अस्मितेचा मानबिंदू असलेल्या शंखनाद करण्याचा विश्‍वविक्रम भारताच्या नावे नाही. त्यामुळे हा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी अनंत विजय शंखनाद या संस्थेने पुढाकार घेत येत्या कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता यशवंत महाराज पटांगणावर विक्रविक्रमी शंखनाद करण्याचा निर्णय घेतला आहे. यात २५ ते ३० संस्थांनी सहभाग नोंदविला असून शंखनाद करणार्या व्यक्तींनी कसून सराव केल्याची माहिती प्रदीप बच्छाव व वृषाली घोलप यांनी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत ३१ ऑक्टोबर रोजी होणार्या ध्वजारोहण कार्यक्रमाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता गोदाआरती होणार आहे. जिल्ह्यातील आदिवासी बहुल सात तालुक्यांमधील ६५० गावांमधील ६५०० आदिवासी बांधव ही आरती करतील. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुलापासून ते संत गाडगे महाराज पुलापर्यंत उजव्या बाजूला हे बांधव आरतीसाठी उभे राहतील. डाव्या बाजूला भाविकांना उभे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने होणारा शंखनाद व गोदाआरतीची विश्‍वविक्रमात नोंद करण्यात येणार आहे. …चौकट एकाच आरती रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे ३१ ऑक्टोबर रोजी विश्‍वविक्रमी गोदाआरती करण्यात येणार आहे. तसेच गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या वतिने त्याच वेळी दुसरी गोदाआरती करण्यात येते. दोन्ही आरती संयोजकांची एकत्रित बैठक घेवून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी तोडगा काढला आणि एकच आरती करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे ३१ ऑक्टोबरला एकच आरती होणार असल्याचे कुंभमेळा प्राधिकरणाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Voting Percentage : गोकुळसाठी ९९.९६ % मतदान; सतेज पाटील, हसन मुश्रीफांची प्रतिष्ठा पणाला, उद्या मतमोजणी, कोण मारणार बाजी?, तालुका निहाय आकडेवारी

Gokul Milk Union Election 2026 : गोकुळच्या मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा; मतपत्रीकेचे फोटो व्हायरल, नजर चुकवून मोबाईलवर काढले फोटो

Tukaram Munde Viral Video : तुकाराम मुंढेंचा VIDEO व्हायरल; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीशी संबंध काय?

मुंबईत नोकरी मिळाली, जॉइनिंग करण्याआधीच आक्रीत घडलं, २३ वर्षीय तरुणीला नराधमाने संपवलं, पुलावरून ओढत नेत...; कुडाळमध्ये काय घडलं?

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये ३ महिन्यांच्या खंडानंतर तुरळक पाऊस; तरीही जिल्ह्यात दुष्काळी चिंता कायम

SCROLL FOR NEXT